वंचित बहुजन आघाडीचे सचिन मेघडंबर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

पाटोदा(दि.१२जून):- वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती पाटोदा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला युवकांसह पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला वंचित चे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर अनिल डोंगरे यांनी भेट दिली तसेच वंचित बहुजन आघाडीचे धनगर समाजाचे नेते विष्णू देवकते किरण वाघमारे राजेंद्र मामा कोरडे गोविंद उजगरे समाधान गायकवाड मोगरी चे सरपंच भारत आहेर धनगर जवळका चे उपसरपंच अभय पवार तर शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष लखन वीर, सोशल मिडिया प्रमुख दत्ता वाघमारे सर, पाटोदा तालुकाध्यक्ष अनिकेत जावळे यावेळी उपस्थित होते.

शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रस्ट मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन होते. आणि ट्रस्ट मार्फत रक्तदात्यास मोफत रक्त पुरविले जाते.या रक्तदान शिबिराला पाटोदा तालुक्यातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला शिवशंभु चॅरीटेबल ट्रस्ट व वंचित बहुजन आघाडी पाटोदा यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सचिन मेघडंबर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रक्तदान कसे श्रेष्ठ आहे हे सांगितलं कार्यक्रमाला सामाजिक राजकीय पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते