डेटॉल कंपनीने घेतली, उदयकुमार पगाडे यांच्या सामाजिक कार्याची दखल

26

🔸चक्क.!! हॅन्डवॉश बॉटलवर छापला यांचा फोटो

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13जून):-जगप्रसिद्ध नावाजलेल्या डेटॉल कंपनीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या काही उत्कृष्ट लोकांना जगभरातून शोधून काढले, आणि त्यांच्या कार्याला नवीन वळण देत, चक्क डेटॉल हॅन्डवॉश बॉटलवर फोटो छापत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

यात महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग असलेला चंद्रपूर जिल्ह्याचे ब्रम्हपुरीतील रहिवासी, युवा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार पगाडे, ह्यांच्या आजपर्यंतचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अश्या अनेक क्षेत्रात जनहितार्थ केलेले कार्य पाहून, डेटॉल कंपनीने ह्यांच नाव आणि फोटो चक्क हॅन्डवॉश बॉटलवर छापला आहे.आणि ऑनलाइन स्वरूपात त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..तसेच येणाऱ्या काही दिवसांत त्यांचा फोटो असलेला डेटॉल हॅन्डवॉश, सोबतच विविध प्रकारचे डेटॉल प्रोडक्टस आणि फ्रेमिंग सन्मानपत्र भेट स्वरूपात घरपोच येणार आहे.असे ई-मेल द्वारे कंपनीने कळविले आहे.