वणी शिवारातील राठी यांचे फॅक्टरीमधे कार्यरत इसमाने घेतली गळफास लावून फाशी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.13जून):-राष्ट्रीय महामार्गावरील वणी शिवारातील राठी यांचे फॅक्टरीमधे कार्यरत इसमाने आपल्या राहत्या कार्टरमधे गळफास लावून फाशी घेतल्याची घटना आज दि.१३ रोजी उघड़कीस आली.मृतक हा यवतमाळ जिल्ह्याच्या केलापुर तालुक्यातील वाढोणा येथील रहिवासी असून सतीश गोपाळ राऊत(५२)अशी त्याची ओळख आहे.मृतक हा राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात असलेल्या राठी यांचे फॅक्टरीमधे काम करीत असून फॅक्टरी परिसरातील कामगारांसाठी असलेल्या क्वार्टरमधे कुटुंबासह रहात होता.

मानसिकदृष्टया सतत दबावात असल्याने त्याने काल रात्री क्वार्टरमधे दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी आपल्या तीन वर्षाचे मुलास घेऊन गावी गेली होती.सकाळी बाजुला राहणाऱ्या कामगारांनी त्याला आवाज दिला परंतु यातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने क्वार्टरचे दार तोडून आत प्रवेश केला असता मृतकाचा मृतदेह आढळून आला.सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक वसंत शुक्ला , पोहवा समिर कामडी,सहकारी भूषण भोयर करीत आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED