विठ्ठल गुळघाणे यांच्या वतीने एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

63

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१३जून):-कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, कामकाज, व्यवहार बंद झाल्याने कामगार, हमाल, शेतमजूर, भूमिहीन, अपंग, निराधार, वृद्ध, रोजंदारीवर धुणे व भांडी करणाऱ्या महिला, भाजीपाला विक्रेते यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशा सगरोळी परिसरातील १००० गरजू कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून विठ्ठल गुळघाणे यांनी आधार दिला आहे. ही मदत घरपोच पोहोंचविण्यात आली आहे.

कोविडमुळे उद्योग धंदे बंद झाल्याने शहरातून ग्रामीण भागाकडे शेकडो मजुरांचे गावा गावात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. आजही हे स्थलांतरित गावातच वास्तव्यास आहेत. हाताला काम नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतमजूर, भूमिहीन, अपंग, निराधार, वृद्ध आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येते, त्यांना अशा परिस्थितीत मदतीचा हात पुढे करणे गरजेचे असल्याने हिंगणघाट तालुक्यातील गावातील सिंधी रेल्वे , समदपुर येथे १००० गरजू कुटुंबांना धान्य व दररोज लागणाऱ्या वस्तू वितरीत करून मदत करण्यात आली.