शैक्षणिक,सामाजिक,राष्ट्रीय व दिव्यांग क्षेत्रात आदर्श कार्य करणारा कोहिनूर हिरा – राजेंद्र लाड

48

सामाजिक बांधिलकी जपणारे,सर्वधर्म समभावाची जपवणूक करणारे,सर्वांच्या सुख – दुखाःत मिसळणारे,सर्वांशीच मित्रत्वाची भावना ठेवणारे, मान – अपमानाने होरपळून न जाणारे, सततच इतरांना कौतुकाची थाप देणारे, स्पष्ट व बिनधास्त बोलणारे, कसलाही न्यूनगंड न बाळगणारे, शिक्षक नेते,दिव्यांग नेते, उत्कृष्ट संघटन कौशल्य, उत्कृष्ट सुत्रसंचलन, उत्कृष्ट वक्तृत्व, कर्तुत्व, दातृत्व, कुशल प्रशासक, विद्यार्थी प्रिय, दिव्यांग प्रिय, सततच शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी धडपडणारे शिक्षक २५ वर्षाची सेवा, कमी वयात तिनशेच्या वरती पुरस्कार, विविध शैक्षणिक व राष्ट्रीय विषयावर शंभरच्या वर लेख व दोनशे च्या वरती कविता लेखन करणारे, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कार्याची आवड असणारे, समाज प्रिय शिक्षक तसेच समाजाच्या भल्यासाठी असलेल्या अनेक योजनांची शासनाकडून जनजागृती केली जाते. यासाठी पोस्टर, बॕनर, वृत्तपत्र, नाटिका,दूरचित्रवाणी, इंटरनेट, व्हाँटसअप, फेसबुक अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो.

मात्र, ही जनजागृती केवळ शासनाचेच काम नाही, तर एक व्यक्ती म्हणून व आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून अनेक योजनांचा प्रचार व प्रसार आपल्या दुचाकीवर बोर्ड लावून तर कधी कॉनर बैठकीतून करत असणारे, शाळेमध्ये विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्याचेही काम करणारे, समाजाच्या भल्यासाठी असलेल्या अनेक योजनांविषयी सतत समाजजागृती करीत असणारे, स्वतः दिव्यांग असणारे, दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडीअडचणींची जाणीव असल्याने दिव्यांग क्षेत्रात राज्यभरातील दिव्यांगांना मार्गदर्शन करणारे, सर्वगुणसंपन्न व्यक्तींमत्व, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक राजेंद्र प्रयागाबाई शाहुराव लाड यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क ने घेतलेली मुलाखत”
—–

*आपला थोडक्यात परिचय सांगा.*

मी राजेंद्र प्रयागाबाई शाहुराव लाड, मुळगाव – चिखली नाथ, ता. पाटोदा, स्थायिक – दत्तनगर, मुर्शदपूर आष्टी, जि.बीड. माझा जन्म १५ जून १९७६ रोजी झालेला असून आज मी वयाची ४५ वर्ष पूर्ण करत आहे.

*आपले शिक्षण*

माझे शिक्षण एम.ए., एम.एड्.(शालेय व्यवस्थापन पदवी, बी. जे.) पूर्ण झालेले आहे.

*शिक्षण कोठे झाले.*

माझे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा, ता.जि.बीड येथे व पाचवी चे भगवान विद्यालय बीड व सहावी ते दहावी जिल्हा परिषद मुलांची शाळा आष्टी, जि.बीड येथे तर अकरावी बंकटस्वामी महाविद्यालय बीड येथे तसेच डी.एड्.शासकीय काँलेज नेकनूर ता.जि.बीड येथून पूर्ण झालेले आहे.

*कौटुंबिक माहिती सांगा.*

मी माझ्या आईवडीलांचा एकुलता एक मुलगा आहे. दोन बहिणी आहेत. त्याही सुशिक्षित आहेत. पहिली बहिण सौ.चंद्रकला सुनिल सानप ही शिक्षिका आहे. तर दुसरी बहिण सौ.वर्षा अविनाश बांगर ही गृहिणी आहे. तसेच आई सौ.प्रयागाबाई गृहिणी असून वडील श्री.शाहुराव नामदेवराव लाड कडा सहकारी साखर कारखान्यात टायपिस्ट होते व ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. पत्नी सौ.सरस्वती गृहिणी असून मुलगा चि.संस्कार दहावीला आहे तर मुलगी कु.संस्कृती बी.ए.एम. एस. चे प्रथम वर्षाचे शिक्षण शेवगाव,जि.अहमदनगर येथे घेत आहे.

*शिक्षकी पेशात कसे आलात.*

वडीलांची खाजगी नौकरी असल्यामुळे अत्यंत कमी पगार व तो ही वेळेवर होत नसल्यामुळे हलाखीची परिस्थिती होती. आम्हां तिघा बहिणभावाचे शिक्षण तसेच आष्टी शहरात घर चालवणे कठीण होते. खर्च पेलवत नसे म्हणून बारावी सायन्स ला अँडमिशन असतांना सोडून देवून स्वतःच्या पायावर उभे रहावे म्हणून मला डी.एड्.ला घातले. त्याकाळी शिक्षकाची नोकरी पटकन लागायची. यामुळे मी १९९४ ला डी.एड्.पुर्ण केले व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ औरंगाबाद मार्फत ७ आँगस्ट १९९५ साली शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. जे काही नौकरी लागेपर्यंत शिक्षण झाले त्यामध्ये माझे काका राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक श्री.यादवराव दाजीबा केकान व माझे मामा श्री.प्रल्हाद ज्ञानोबा चौरे (दोघेही रा.खंडाळा,ता.जि. बीड) यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच आमचे शिक्षण पूर्ण झाले याची जाणीव मला असून त्यांचे उपकार या जन्मी फिटणे अशक्य आहे. त्यामुळे ते माझे शैक्षणिक दैवत आहेत.

*नौकरीत आज पर्यंत कोठे – कोठे काम केले.*

प्रथम नेमणूक जि. प. प्रा. शा. मातावळी,केंद्र – मातकुळी, ता.आष्टी, जि.प.प्रा.शा. चिंचपूर, केंद्र – मातकुळी,ता.आष्टी (प्रतिनियुक्ती), जि. प. प्रा. शा. शेकापूर, केंद्र – ब्रम्हगाव, ता.आष्टी (प्रतिनियुक्ती), जि.प.प्रा.शा.पांढरी,केंद्र – जामगाव, ता.आष्टी येथे सहशिक्षिक म्हणून तर जि. प. प्रा. शा.कारखेल बु.,केंद्र – डोईठाण, ता.आष्टी येथे प्राथमिक पदविधर म्हणून तसेच जि. प. कें. प्रा.शा.जामगाव, ता.आष्टी,जि. बीड येथे प्राथमिक पदविधर तथा प्रभारी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून कामकाज केलेले आहे व आज रोजी जिल्हा षरिषद कन्या प्रशाला आष्टी येथे प्राथमिक पदविधर म्हणून कार्यरत आहे.
तसेच विषयतज्ञ – अपंग समावेशित शिक्षण, सर्व शिक्षा अभियान, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पं.स.आष्टी तसेच तालुका समन्वयक – संपूर्ण स्वच्छता अभियान, पंचायत समिती, आष्टी तसेच मास्टर ट्रेनर – जनगणना २०११, तहसिल कार्यालय, आष्टी, तालुका समन्वयक – साक्षर भारत योजना, गशिअ कार्यालय, आष्टी तसेच केंद्रसमन्वयक – केंद्र आष्टी नं.१, ता.आष्टी,जि.बीड येथे वेगवेगळ्या पदावर राहून शैक्षणिक कार्याबरोबरच प्रशासकीय कार्य केलेले आहे.

*शिक्षणाशिवाय आणखी कोणती आवड आहे*

अपंग समावेशित शिक्षण या विभागात विषयतज्ञ म्हणून काम करत असतांना दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याशी निकटचा संबध आल्यामुळे व मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगांना येणाऱ्या अडीअडचणी, त्यांची परिस्थिती, समस्या जवळून पाहता आल्या आणि त्यामुळेच दिव्यांगांप्रती कार्य करण्याची आवड निर्माण झाली. तसेच शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात तन, मन व धनाने कार्य करण्याची व त्यासंबंधी असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याची आवड आहे.

 

*आज पर्यंत केलेले शैक्षणिक कार्य सांगाल.*

शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतांना मी लहानपणी माझ्या जीवनात जवळून गरीबी अनुभवली असल्यामुळे शाळेतील व परिसरातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फीस, कधी – कधी आर्थिक मदत केलेली आहे. विशेष करुन दिव्यांग विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागेल ती माझ्या कुवतीप्रमाणे मदत केलेली आहे.स्वच्छ शाळा – सुंदर शाळा सहभाग,गुणवत्ता विकास कार्यक्रम,शाळेच्या प्रगतीसाठी समाजाचा सहभाग मिळवून डिजीटल स्कूल, ई-लर्निंग, वाचनालय, संगणक, एलसीडी प्रोजेक्टर,आयएसओ नामांकन शाळा,भव्य क्रिडांगण, पाणी पिण्याची सोय आदी सुविधा पूर्ण केलेल्या आहेत. वाचन प्रेरणा दिवस साजरा करुन वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलेले आहे. कवी, लेखक आपल्या भेटीला, बाल आनंद मेळावा, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची वाजत – गाजत गावातून बैलगाडीत मिरवणूक, वेगवेगळ्या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक बक्षिसे, विज्ञान प्रदर्शनात सहभाग, अनेक वेळा बालरक्षक म्हणूनही भूमिका बजावली आहे, ज्ञानरचनावादी शिक्षण दिलेले असून माझे अनेक विद्यार्थी मोठ – मोठ्या पदावर काम करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.

*शिक्षण क्षेत्रात काम करताना काय वाटते.*

माझे काका श्री.यादवराव दाजीबा केकान शिक्षक असल्यामुळे व त्यांच्या सहवासात लहानपण गेल्यामुळे शिक्षणाचा सहवास मला लाभला होता. करील मनोरंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभुशी तयांचे असे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाटतो, विद्यार्थी दैवत समजूनच आजपर्यंत कार्य केले आहे.

*शिक्षक, विद्यार्थी नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते.*

शिक्षक, विद्यार्थी नाते दोन प्रकारे असु शकते. एक भीती वर आधारित तर दुसरे आदरयुक्त. विषमतेचे नाते शिक्षक, विद्यार्थी संबंधात नसले पाहिजे. नाते जोडताना शिक्षकांमध्ये अहंगंड नसावा व विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड नसावा तरच योग्य नाते जोडले जाते. विद्यार्थ्याशी बोलताना नम्रतेने बोलले पाहिजे तरच ते नाते अधिक दृढ होते.

*विद्यार्थ्याशी शिक्षकाची वागणूक कशी असावी.*

हे पहा शिक्षक वरिष्ठांशी वागतांना नम्रतेने वागतो त्यामध्ये त्यांची भूमिका नेहमी यश सर असते मग विद्यार्थ्यांशीं मात्र आक्रमक व संतापी वागाल तर त्याला तुमच्यामध्ये हुकूमशाही वृत्तीचे दर्शन होईल म्हणजेच त्याच्याबरोबर प्रेमाने, ममतेने, जिव्हाळ्याने व आपुलकीने वागले पाहिजे.

*समाज आणि शिक्षक या विषयी काय सांगाल.*

शिक्षक हा समाजासाठी दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे म्हणूनच पूर्वी शिक्षकाला गुरुचे स्थान होते. समाज मग कालचा असेल उद्याचा असेल किंवा आजचा असेल या समाजाचा खरा शिल्पकार शिक्षक आहे आणि असेल हे गृहीत समाज मान्यच आहे. यामुळे आज समाजात अनेक वेळा तुझ्या शिक्षकांनी हेच शिकवलं का? असे बोलतांना आपण ऐकतो म्हणून समाजातील चालीरीती, रूढी, परंपरा, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास शिक्षकाने केला पाहिजे व समाजाभिमुख होऊन शिकवले पाहिजे असे माझे मत आहे.

*सध्या भूषवित असलेले पदे कोणती.*

सध्या मी जिल्हाध्यक्ष – शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड, राजदूत – दिव्यांग मतदार नोंदणी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, सदस्य – दिव्यांग स्थानिक स्तर समिती, समाजकल्याण कार्यालय बीड, अध्यक्ष – शिक्षक मित्र ग्रामीण कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, आष्टी, तालुकाध्यक्ष – वंजारी सेवा संघ आष्टी, संचालक – संत वामनभाऊ प्रतिष्ठान आष्टी आदी तसेच वेगवेगळ्या शिक्षक संघटना, दिव्यांग संघटना, मंडळे, समाजसेवी संस्था, सामाजिक संघटना, राष्ट्रीय संघटनेच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे. विशेषतः शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत असल्यामुळे राज्यभरातील आदर्श व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे विविध पदे भूषविण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदाला योग्य न्याय देण्याचे काम मी निस्वार्थपणे केलेले आहे.

*आजपर्यत आपणांस किती पुरस्कार मिळालेले आहेत.*

आजतागायत मला सुमारे तिनशे च्या वरती शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय व साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार मिळालेले आहेत.
महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार, जि.प.बीड चा जिल्हा शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला असून मी एकमेव नशिबवान शिक्षक असा आहे की, राज्य व जिल्हा शिक्षक पुरस्कार मला सन – २०१६ साली एकाच वर्षी प्राप्त झालेला आहे.

 

*आपण केलेली सामाजिक व राष्ट्रीय कार्य थोडक्यात कोणती.*

पल्स पोलिओ लसीकरण, दिव्यांग मतदार नोंदणी, राष्ट्रीय मतदार दिन, गोवर – रुबेला लसीकरण, कोरोना लसीकरण व त्या संदर्भात लेख, कविता लेखन, अल्पबचत, कुटुंब कल्याण, साक्षरता अभियान,स्वच्छता अभियान, गुडमाँर्निंग – गुडइव्हिनिंग पथक, जनगणना आदी राष्ट्रीय कार्यात सहभाग घेवून प्रचार व प्रसार केलेला आहे. तसेच शिक्षक मित्र मंडळाच्या वतीने अनेक आदर्श शिक्षकांना “ज्ञानरत्न पुरस्कार” वितरण, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वतः दिव्यांग असतांना देखील श्रमदान व मार्गदर्शन, सर्वधर्म समभाव म्हणून संविधान दिनाला शासकीय कार्यालयांना संविधान प्रास्ताविकेचे वाटप, पवित्र रमजान महिन्यातील मुस्लीम धर्मातील रोजा धरणे, वाढदिवसानिमित्त वेडसर, भिकारी, अनाथ,दिव्यांग व्यक्तींना भोजन देणे, डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, महात्मा फुले जयंती,आण्णाभाऊ साठे जयंती आदी थोर महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग, सामाजिक बांधिलकी म्हणून शौचालय बांधा अन् पाचशे रुपये मिळवा ही योजना दिव्यांग बांधवांसाठी राबविली तसेच झाडे लावा व पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा, कोरोना काळातील आदर्श व्यक्तींना कोरोना योध्दा सन्मानपत्र वाटप, दिव्यांगांसाठी मार्गदर्शन केंद्र, दिव्यांगांना साहित्य व उपकरणे मिळवून देणे,दिव्यांग तपासणी शिबीर, दिव्यांग शांतता रँली, दिव्यांगांसाठी जनता दरबार, जागतिक दिव्यांग दिन,दिव्यांग मेळावा, मेल – जोल कार्यक्रम, शिक्षकांना मोफत दिनदर्शिका वाटप, आयएसओ नामांकन शाळा, विविध वर्तमानपत्रातून शैक्षणिक, सामाजिक,राष्ट्रीय कार्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सुमारे तिनशेच्या वरती लेखांचे व सुमारे दोनशेच्या वरती कवितांचे लेखन केलेले आहे. तसेच दै.रयतेचा वाली,बीड जिल्हा प्रतिनिधी या नात्याने जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक बातम्या प्रसिद्ध करुन सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे.

*सेवाअंर्गगत प्रशिक्षणे घेतली आहेत काय?*

होय – बाहुलीनाट्य प्रशिक्षण, बाल आनंद मेळावा प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण शिबीर व साहित्य संमेलन,टेलिकाँन्फरन्सद्वारा प्रशिक्षण, प्रश्ननिर्मिती प्रशिक्षण, स्वंयअध्ययन उपक्रम व साहित्य क्षमताधिष्ठित चाचण्यांची निर्मिती, वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक प्रशिक्षण, कृतिसंशोधन प्रशिक्षण, लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण, दिव्यांगांच्या संदर्भातील प्रशिक्षणे, समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे प्रशिक्षण व इतर असे सुमारे दिडशेच्या वरती राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर प्रशिक्षणे घेतली असून अंदाजे शंभराच्या वरती राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरावरील प्रशिक्षणात तज्ञमार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे.

*शैक्षणिक क्षेत्रात काही संशोधन केलेले आहेत काय?*

होय – १) पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बोली भाषेचा प्रमाणित भाषेवर होणारा परिणाम व उपाय. २) सहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा सांगितलेला गृहअभ्यास न करण्याच्या प्रवृत्तीमागील कारणांचा शोध घेवून उपाय सूचविणे. ३) आष्टी तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानातील उपक्रमांचा संशोधनात्मक पद्धतीने केलेला अभ्यास अहवाल. ४) आष्टी तालुक्यातील सातवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा सांगितलेला गृहपाठ न करण्याच्या प्रवृत्तीमागील कारणांचा शोध एक अभ्यास आदी विषयावर संशोधन केलेले आहे.

*आपण दिव्यांगत्वावर मात करुन इतर दिव्यांगांसाठी काय – काय केले.*

मी स्वतः उजव्या पायाने ४५ टक्के कायमस्वरुपी दिव्यांग असून माझ्या दिव्यांगत्वावर मात करुन इतर दिव्यांगांच्या अडीअडचणीसाठी सततच धडपडत असतो. सर्व सामाजिक, राजकीय,शैक्षणिक व्यक्तींबरोबर मित्रत्वाची भावना तयार करुन दिव्यांग विद्यार्थी,दिव्यांग कर्मचारी, दिव्यांग सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविलेले आहेत. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सतत धडपडत असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात माझी एक प्रकारची ओळख निर्माण झाल्यामुळे दिवसभरात कमीत कमी तिस ते चाळीस जणांच्या भ्रमणध्वनीद्वारे विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करावे लागते.
दिव्यांगांच्या शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र, कँलिपर्स, कुबड्या, व्हील चेअर, ट्रायसिकल, चष्मे,कमोडचिअर, सिडीप्लेअर,टेबल लँम्पस, लोव्हीजन किट,टेपरेकॉर्डर,लार्ज प्रिंट पुस्तके, मदतनिस भत्ता, लेखन-वाचन भत्ता, दिव्यांग शिष्यवृत्ती, दिव्यांग तपासणी शिबीर, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, दिव्यांगांसाठी विविध थेरपी, मतिमंदांचा बुध्दीगुणांक काढणे, दिव्यांग मेळावे,दिव्यांगत्व निदान शिबीर, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मोर्चा, धरणे, आंदोलने, एस.टी.बसेस पासेस मिळवून देणे, दिव्यांगांच्या तक्रारींचे निराकरण करणे, डाँ.हेलन केलन प्रतिष्ठान च्या वतिने पुरस्कार देणे, बीज भांडवल योजना, संजय गांधी योजना,दिव्यांग सुदढ योजना, दिव्यांगांसाठी घरकुल योजना, दोनशे चौ.फुट जागा देणे, स्वावलंबन कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन, इन्कम टँक्स मार्गदर्शन, वाहन भत्ता व पिटँक्स माफी बाबत मार्गदर्शन, दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य व उपकरणे मिळवून देणे, बदली सुट, लाँकडाऊन काळात उपस्थितीत सुट बाबत मार्गदर्शन, निवडणूक,जनगणना व इतर सर्वे मधून शासकीय नियमान्वये सुट मिळवून देणे,दिव्यांग कायदा २०१६ बाबत मार्गदर्शन, कायद्यान्वये दिव्यांग अँट्रासिटी बाबत योग्य मार्गदर्शन, चार चाकी गाडी साठी रोड टँक्स माफी बाबत आदी योजनांसाठी सुयोग्य मार्गदर्शन व वेळोवेळी पाठपुरावा करुन दिव्यांगांची अनेक प्रकरणे निकाली काढले आहेत. महाराष्ट्रातील पहिला दिव्यांगांचा जनता दरबार आयोजित करुन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून दिव्यांगांचे अनेक प्रश्न निकाली काढून अनेक प्रश्नांचा उहापोह करण्यात आलेला आहे.
मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडीअडचणींची जाणीव असल्याने पोलिओमुळे कोणी दिव्यांग होवू नये, यासाठी पोलिओ जनजागृतीपासून माझ्या कार्याची सुरुवात झाली. लहान मुलांना पोलिओ डोस वेळेवर पाजावेत यासाठी मी आग्रही असतो. विशेषतः दिव्यांग बांधवांनी शौचालय बांधावे यासाठी दिव्यांगांनी शौचालय बांधा व पाचशे रुपये मिळवा ही प्रोत्साहनपर योजना राबवून अनेक दिव्यांगांना आर्थिक मदतीचा हातभार लावलेला आहे.
माझ्याकडे दुचाकी असून यावर मी विविध दिव्यांगांच्या योजनांच्या माहितीचे फलक लावून त्यातून जनजागृती करीत आहे.तसेच वृत्तपत्र, व्हाॕटसअप, फेसबुक आदी तंत्रज्ञानाच्या गोष्टीतून दिव्यांगांच्या नवनवीन योजनांचा प्रचार व प्रसार करत आहे. यात मला फार आनंद मिळतो. माझ्या दिव्यांग बांधवांच्या आर्शिवादाने मी आज खुप सुखी व समाधानी आहे. माझ्या दिव्यांग बांधवांचा मला सार्थ अभिमान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी दिव्यांगांसाठी तन,मन,धनाने कार्य करीतच राहणार आहे.

*आपल्या जीवनातील जडणघडणीतील काही प्रिय व्यक्तींची नावे सांगा.*

माझ्या जीवनातील जडण,घडणीत आईवडील, नातेवाईक तसेच शैक्षणिक क्षेत्रात श्री.यादवराव केकान, श्री. एन. बी. औताडे, श्री.शिवाजी शिंदे, श्री.पी.वाय.काळे, श्री.संपत धोंडे, श्री.सी.डी.देशमुख,श्री.सुधाकर यादव, श्री.मनोरंजन धस, श्री.श्रीराम कणाके, संघटनेच्या क्षेत्रात श्री.भास्करराव सरदेशमुख,श्री.आर.जी.कदम, श्री.एस.आर.पाटील, श्री. गोरक्षनाथ सायकड, दिव्यांग क्षेत्रात श्री.दिगांबर घाडगे, श्री.परमेश्वर बाबर, श्री.रविंद्र पाटील, श्री.अशोक आठवले, श्री.महादेव सरवदे, श्री.हनुमंत अवघडे, काव्य लेखन क्षेत्रात श्री.सय्यद अल्लाउद्दीन, श्री.हरिष हातवटे, श्री.विठ्ठल जाधव,लेखन क्षेत्रात श्री.अनंत हंबर्डे, श्री.अनंत कराड,पत्रकारिता क्षेत्रात श्री. गंमतभाऊ भंडारी, श्री.जफर नाझ, श्री.रत्नाकर वरपे, श्री.नामदेवराव क्षिरसागर, श्री.संतोष मानूरकर, श्री.श्रीपती माने,श्री.उत्तम बोडखे,श्री.दत्तात्रय काकडे,श्री.सुभाष चौरे, श्री.रघुनाथ कर्डीले, श्री.शरद तळेकर,श्री.अविनाश कदम, दै.रयतेचा वाली चे संपादक तथा आदर्श बालरक्षक श्री.शाहू संभाजी भारती, सामाजिक क्षेत्रात श्री.पोपटराव पवार, श्री.अँड. अजित देशमुख, श्री.संतोष दाणी, श्री.डाँ.संजय तांदळे तसेच आज पर्यंतचे सर्व गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व माझे सर्व शिक्षक सहकारी बांधव, दिव्यांग बांधव, मित्रपरिवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशा या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्वास वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….!!!