दी स्टुडन्ट वेल्फेअर असोसिएशन पुरस्कृत भारतीय विद्यार्थी संघटनेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी डॉक्टर जितीन वंजारे यांची निवड

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.१३जुन):-शिव शाहू फुले आंबेडकरी विचाराचे विचारवंत,आंबेडकरी चळवळीतील समता वादी विचारसरणी चे सामाजिक कार्यकर्ते-डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नितीन दोंदे सर यांनी व इतर संचालक मंडळी यांनी नियुक्ती पत्रक देऊन त्यांची मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर हे अठरा विश्व गरीबीतून शिव शाहू फुले आंबेडकरी विचार समोर ठेऊन आपल आदर्श जीवन जगत आहेत.रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन ते संजीवनी सेवाभावी संस्था संचलित संजीवनी हॉस्पिटल खालापूरी च्या माध्यमातून ते गोर गरीब रुग्णांची सेवा करीत आहेत , समाजातील वंचित घटका साठी ते काम करतात.महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे “शिका संघटित व्हा आणी संघर्ष करा” या युक्ती प्रमाणे शिकून उच्च शिक्षन घेऊन समाजातील सामाजिक विषमता,शैक्षणिक अधोगती ,दलितांवरील अत्याचार अन्याय ,विद्यार्थी लूट,शेतकऱ्यांचे प्रश्न ,विकासाची प्रश्न ,शहरी ग्रामीण भागातील प्रश्न ,रस्त्याचे प्रश्न ,विजबिल माफी ,शेतकरी अनुदान ,शेतकरी कर्जमाफी ,शेतकरी पीकविमा ,डॉक्टरांचे प्रश्न ,विदयार्थी आत्महत्या ,विद्यार्थी फीस ,खाजगी शिकवनी फीस,दलितांवरील अन्याय अत्याचार ,शासकीय अधिकारी यांच्या दिरंगाई विरोध निषेध ,सामान्य शेतकऱ्यांची अनेक प्रश्न,महागाई,भाववाढ,शेतकरी मालाला भाववाढ द्यावी,हमीभाव ,शासन चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड,शेतकरी आत्महत्या अशी अनेक विषयावर डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी वेळोवेळी जण आंदोलन,रास्ता रोको, निवेदन ,निदर्शने केली आहेत.

या सर्वांचा आढावा घेऊन शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील मित्र परभणी चे व्याख्याते शिवश्री सुदर्शन भांबळे यांच्या शिफारसीने संस्थापक अध्यक्ष मा.नितीन दोंदे यांच्या कडे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या सामाजिक कार्याचा सखोल आढावा दिला गेला यावर संचालक मंडळी नी योग्य विचार-विनिमय करून तात्काळ मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांची निवड ‘भारतीय विद्यार्थी संघटना’ च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी सर्वानुमते केली.

या निवडी च्या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मराठवाड्यातील विदयार्थ्यांच्या प्रश्नाना शासनदरबारी योग्य न्याय मिळवून देऊ ,विद्यार्थी प्रश्न कोणताही असो माझा कार्यकर्ता तिथे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही .आम्ही आमच्या मागण्या शासनदरबारी लावून धरू आणी विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी न्याय मिळवून देऊ. कोणत्याही विदयार्थ्यांना कसलीही अडचण असेल तर निसंकोचपणे मला सांगा आम्ही नक्कीच त्यावर समाधानकारक कार्य करू.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिले.तसेच गरिबांची शोषित पीडित दलितांची मुले जास्तीत जास्त संख्येने शिक्षणाच्या प्रवाहात आणू तश्या अनुषंगाने प्रयत्नशील राहू,संघटनेचे कार्य तळागळा पर्यंत पोहचून सर्व विद्यार्थ्यांना योग्य न्याय देऊ. असा शब्दही यावेळी डॉक्टर जितीन वंजारे यांनी दिला.