चिमुरडी च्या गाण्याच्या सुमधूर आवाजाने पालकमंत्री छगन भुजबळ मंञमुग्ध

25

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.14जून):- राज्याचे अन्न पुरवठा व जिल्हा पालकमंत्री येवला तालुका दौर्यावर असताना त्यांना येवला येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संपर्क कार्यलय येथे येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील श्री.गौतम पगारे यांची कन्या कु.आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना सुमधूर आवाजाने गाणे ऐकवले.

यावेळेस मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रमुग्ध होत त्या चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक केले.यावेळी उपस्थित नागरिक आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे.संगीत क्षेत्रात तिचे भविष्य उज्वल असून तिला शक्य तेवढी मदत करण्याचा शब्द यावेळेस भुजबळ यांनी आम्रपाली व तिच्या वडिलांना दिला.