मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंना अचानक जाग कशी आली?

31

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे हे अचानक जागे कसे झाले? असा प्रश्‍न माझ्यासारख्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीला पडला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होत आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रामुख्याने २०१६ पासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चेला आला. राज्यातील मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा अशाप्रकारे घोषणा देत राज्यात ५८ मोर्चे काढले. त्या मोर्चांना राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चाने मराठा आरक्षण मार्गी लागेल अशाप्रकारे आशा निर्माण झाली. त्यासाठी मराठ्यांना शिक्षणात १२ टक्के व नोकर्‍यात १३ टक्के आरक्षण त्यावेळच्या फडणवीस सरकारने घोषित केले. गायकवाड आयोगाच्या शिफारशी मुंबई उच्च न्यायालयाने लागू केल्या. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करत मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचा आनंद झाला.

परंतु या आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते सर्वोच्च न्यायालयात गेलेच त्याचबरोर अनेक ब्राम्हणांनीही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु केवळ गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीलाच मीडियाने फोकसमध्ये ठेवले. कारण भांडणे लागली तर मराठा आणि एससीमध्येच लागतील ही ब्राम्हणांची कपटी चाल होती. परंतु मराठा आरक्षणाविरोधात नावे पाहिली तर अनेक ब्राम्हण आहेत. त्यात संजीत शुक्ला, मधुश्री नंदकिशोर जेठलिया, देवेंद्र रूपचंद जैन, कमलाकर सुखदेव दरोडे, ईशा देशमुख, आदित्य बिमल शास्त्री, अमिता गुगाले, सागर सारडा, उदय ढोपले, विष्णूजी मिश्रा, रूचिता कुलकर्णी, श्रीहरी अणे यासारखी मंडळी आहेत. त्यात सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेचे लोक आरएसएसशी संबंधित आहेत. ते लोकदेखील सर्वोच्च न्यायालयात गेले. म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला ब्राम्हण विरोध करत आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

मराठा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यातच राज्यातील भाजपा नेत्यांनी डबल ढोलकी वाजवली. मराठा आरक्षणाला आम्हांला पाठिंबा आहे. परंतु यांचेच लोक मराठा आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु सदावर्तेचे नाव मीडियात जास्त चालवण्यात आले हे लक्षात घेण्याची गरज आहे.आज राज्यात पुन्हा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचा दौरा सुरू केला आहे. ते लोकांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाबाबत भाष्य करत आहेत. ते विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा लढ्याचे त्यांनी रायगडावरून रणशिंग फुंकले जरूर, परंतु ते कोणाच्या इशार्‍यावर असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. कारण संभाजीराजेंची भाजपाच्या कोट्यातून १२ जून २०१६ रोजी राज्यसभा खासदार म्हणून निवड करण्यात आली. म्हणजे आता संभाजीराजेंना राज्यसभा खासदारकी मिळून पाच वर्षे झाली आहेत. या पाच वर्षात त्यांनी राज्यसभेत आवाज का उठवला नाही? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. हे सभागृह त्यांनी मराठा आरक्षणावरून दणाणून सोडायला हवे होते. परंतु तेथे संभाजीराजे मूग गिळून गप्प बसले. सभागृह बंद पाडायला हवे होते. राज्यसभा हे विचारपीठ आहे. विचारपीठावर विचार व्यक्त करायला हवे होते. परंतु त्यांनी काही मराठा आरक्षणाच्या समर्थनात ब्र देखील काढला नाही.

जसे १० टक्के सवर्णांना आरक्षण देताना १२४ वी घटनादुरूस्ती करण्यात आली. म्हणजे ब्राम्हणांनी आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन किंवा कुठला नाराही दिला नाही. तरी त्यांना १० टक्के आरक्षण घटना दुरुस्ती करून देण्यात आले. जर का सवर्ण म्हणजे ब्राम्हणांची मागणी नसताना १० टक्के आरक्षण दिले तर मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत राज्यसभेत संभाजीराजे यांनी का आवाज उठवला नाही? सवर्णांना १० टक्के आरक्षण देत असाल तर मराठ्यांनाही आरक्षण मिळायला हवे अशी संभाजीराजेंनी ठाम भूमिका का घेतली नाही? का त्यांनी कचकाऊ भूमिका घेतली? असे अनेक सवाल निर्माण होत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बोलायला हवे तेथे बोलत नाहीत आणि जेथे बोलायला नको तेथे लोकांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाच्या गप्पा झोडताना दिसत आहेत. लोकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही राज्यसभेवर आहात ना? मग भाषा लोकांची बोलायला हवी. परंतु तेथे काहीच न बोलता आरएसएसच्या सुरात सूर मिळवताना दिसता, मग जनतेत जाऊन बोंबलायला कशाला हवे?

राज्यात मराठा बांधवांनी ५८ मोर्चे अगदी शांततेत काढले. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गेली पाच वर्षे धगधगत असताना संभाजीराजे कुठे होते? त्यावेळी काढण्यात आलेले ५८ मोर्चे हे आरएसएसच्या इशार्‍यावर व मदतीवर काढण्यात आले होते. हे मोर्चे ब्राम्हणांच्या इशार्‍यावर काढण्यात आले होते याची टीप्पणी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आपल्या भाषणात केली होती. म्हणजे या मोर्चांमागे आरएसएसची ब्राम्हणी पिलावळ होती हे दिसून आले होते. मेश्राम यांनी केलेल्या टीप्पणीनुसार मराठा आरक्षणाबाबत आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून आता आरएसएसने छुपी भूमिका घेत एक मराठा असलेल्या संभाजीराजेंना जनतेत जाण्याचे फर्मान सोडले नसेल कशावरून? असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. म्हणजे आरएसएसच्या ब्राम्हणांचे हे मांडलिक खासदार स्वत:चे काहीच डोके चालवताना दिसत नाहीत. केवळ ‘आरएसएस बोले आणि खासदार संभाजीराजे डोले’ अशी परिस्थिती झाली आहे. एकेकाळी राजे-रजवाड्यांच्या काळात अनेक राजांनी आपल्याकडे ब्राम्हणांना कामाला ठेवले होते.

म्हणजे ब्राम्हण हा नोकर होता. तोच त्यावेळचा नोकर असलेल्या ब्राम्हणांनी आजच्या घडीला स्वत:ला राजे म्हणवणार्‍या संभाजीराजेंना गुलाम बनवले आहे.मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंच्या मनात आस्था आहे त्याबाबत त्यांचे अभिनंदन करायला हवे. परंतु हा प्रश्‍न राज्यसभा खासदार म्हणून सभागृहात उपस्थित करायला हवा. परंतु तसे करताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ रायगडावरून रणशिंग फुंकून आणि लोकांमध्ये जाऊन हा प्रश्‍न सुटणार नाही. तर संसदेमध्येच हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. संभाजीराजेंनी अनेकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपाचे राज्यसभा खासदार असूनही त्यांना मोदी यांनी भेट दिली नाही. यावरून मोदी हे आरएसएसच्या ब्राम्हणांच्या इशार्‍यावरून चालत आहेत. स्वत:च्या राज्यसभा खासदाराला कुठलाही प्रधानमंत्री भेट कशी काय नाकारू शकतो? याचा अर्थच आरएसएस कडून त्यांना न भेटण्याचे संकेत मिळाले असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपले डोके ठिकाणावर ठेवून काम करायला हवे. संभाजीराजेंच्या मेंदूवर ब्राम्हणांचा कब्जा असेल तर मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागणार नाही. ज्या ब्राम्हणांनी बहुजनांच्या आरक्षणाला विरोध केला त्यांच्याच मांडीला माडी लावून बसत असाल,त्यांच्याच पक्षांकडून खासदारकी घेऊन मिरवत असाल तर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटणारच नाही. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम नेहमीच सांगतात, जो व्यक्ती लोकांची जागृती करतो तो लोकांना फसवत नाही, आणि जो फसवतो तो लोकांची जागृती करत नाही. काय संभाजीराजे मराठ्यांना फसवत आहेत की त्यांची जागृती करत आहेत? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

✒️लेखक:-दिलीप बाईत(९२७०९६२६९८)मंडणगड,जिल्हा रत्नागिरी