केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वरूपात धान्य वाटप करा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

39

🔹लाभार्थ्यांनी घेतली माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१५जुन):-ए.पी.एल शेतकरी योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट घेतली व त्यांच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा दिला त्यानिमित्त माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मागणी केली की.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ए.पी.एल शेतकरी धारकांना मोफत स्वरुपात धान्य वाटप करण्याबाबतची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

महाराष्ट्रात मार्च २०२० पासून कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे महामारीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने लॉकडाउन घोषित केले. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक शेतकरी,शेतमजूर, कामगार ,गोरगरीब मजूर वर्गावर ज्यांच्या हातावर आणून पानावर खाण्यात इतपत परिस्थिती होती. अशा लोकांचा रोजगार हिरावून गेला त्यामुळे गोरगरीब जनतेला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. कुटुंबाचे पालन-पोषण, मुलांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला.
अशा ढासाळलेल्या परिस्थितीत अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत महाराष्ट्रातील अंतोदय कार्ड धारकांची संख्या २४,८३,९०४, लोकसंख्या १,०७,२७०८२ प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कार्ड धारकांची संख्या १,२७,२२११९ यांना नियमित धान्य सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत धान्य देण्यात येत आहे.

परंतु महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्या पैकी १४ जिल्ह्यामध्ये ए.पी.एल शेतकरी योजना लागू करण्यात आलेली आहे. ज्यांना महाराष्ट्र सरकार तर्फे प्रति व्यक्ती ०५ किलो गहू व तांदूळ देण्यात येत आहे. त्यांची महाराष्ट्रातील एकूण कार्ड संख्या ९.११,८२९ असून लोकसंख्या ४०,३६,३५३ आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रतिव्यक्ती ०५ किलो गहू व तांदूळ मोफत स्वरूपात मिळत आहे व पुढील ऑक्टोंबर २०२१ पर्यंत मिळणार आहे.

परंतु ए.पी.एल शेतकरी योजनेत समाविष्ट लाभार्थ्यांची आज परिस्थिती अत्यंत वाईट असताना सुद्धा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत मोफत धान्यापासून वंचित आहे.
तरी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ए.पी.एल शेतकरी धारकांना मोफत स्वरूपात धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे केली आहे.