महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा ; नंदू भाऊ गट्टूवार

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15जून):-वरिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याबाबत सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांच्याकडे केली आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र 15 किंवा 20 जूनच्या दरम्यान सुरू होते. तसेच जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियाही सुरु होते. कारण बहुतांशी परीक्षांचे निकाल जून जुलै महिन्यात जाहीर केले जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च 2020 पासून शैक्षणिक क्षेत्रातील अध्ययन अध्यापन व मूल्यमापन ह्या घटकामध्ये आमूलाग्र बदल करावे लागले आहे.

ऑनलाइन पद्धतीने अध्यापन व मूल्यमापन करण्याचा पर्याय वापरण्यात आला आहे.मात्र सध्या कोरोनाच्या संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोनाच्या नियमाचे पालन करून अनेक क्षेत्र सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे उच्चशिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा घटक असून सर्व बाबींचा विचार करून सरकारने महाविद्यालय सुरु करण्याबाबतच धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र नेमके केव्हा सुरू होईलयासंदर्भात राज्य सरकारने नेमकी भूमिका स्पष्ट केली तर विद्यार्थी, पालक शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या सेवक वर्ग यांच्यातील संभ्रमाचे वातावरण दूर होईल म्हणून विद्यालय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही आंतरराष्ट्रीय बजरंग दल के नेता नंदू भाऊ गट्टूवार स्पष्ट केले आहे