महिला शेतकऱ्यांना बियाणे व औषधीचे मोफत वितरण

🔸माविमचा शेतकऱ्यांसाठी आदर्श उपक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जून):-महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून जी, आय. झेड .बायर व मा.वि.म. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळामध्ये दोनशे महिला शेतकऱ्यांना बियाणे व औषधीचे मोफत वितरण करण्यात आले,

कोरोणा संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी १५ जून २०२१ रोज मंगळवार रोजी दोनशे महिला शेतकऱ्यांना बियाणे व औषधीचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ.मोहिनीताई आ.इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष एडवोकेट आशिषभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे, बाळासाहेब कांबळे,संस्कार परिवाराच्या सचिव शालिनीताई वैद्य. उपस्थित होते.

यावेळी महिला शेतकऱ्यांना औषधी व बियाणाची वितरण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक आश्विनी पुनवटकर. बायर आणि मा,वि.म.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत बियाणे वाटप यांच्या संकल्पनेबद्दल संपूर्ण माहिती दिली व या मोफत बियाणे औषधीचा उपयोगातून आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले .

महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविणाऱ्या मा. वि. म. च्या कार्याचे कौतुक करीत त्यांचे कार्य वाढीस लागावे अशा शुभेच्छा देत महिला शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर प्रगती साधावी अशा अपेक्षा सुद्धा केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. आशिषभाऊ देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. रंजन वानखेडे. यांच्या मार्गदर्शनात लोकसंचालित साधन केंद्राच्या लेखापाल अर्चना पांडे,समन्वयक सीमा मनवर,आम्रपाली खंदारे, सहयोगीनी स्वर्णा उबाळे,सुजाता कांबळे,रूपाली धोंगडे, गंगाताई पोटे,माधुरी इंगोले, शिल्पा बावणे, जयश्री रोकडे, वंदना डांगे,कृषी सहाय्यक बाळू धाड,प्रमोद इंगोले यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED