आता यापुढे दिव्यांगांना हि पोलिस खात्यात भरती होता येणार

21

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.16जून):- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्या दि ४ जानेवारी २०२१ रोजीच्या अधिसुचनेद्वारे दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित केलेली आहेत.सदरहु अधिसुचने अन्वये दिलेल्या सुचना अणुषंगाने पोलिस महासंचालक यांनी पोलिस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी/कर्मचारी व इतर कर्मचारी संवर्गातील पदे पडताळणी व प्रमाणीत करून कार्यालयीन पत्र क्रं.पोमसं ८ – अ/अपंग व्यक्ती/सुयोग्य पदांचा शोध/१२५/२०१९ दि ७ एप्रिल २०२१ अन्वये शासनास सादर केली आहे.पोलिस महासंचालक यांनी सादर केलेल्या व सोबत जोडलेल्या विवरण पत्र – अ मध्ये दर्शविल्यानुसार याद्वारे दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्यात येत आहेत ती पदे पुढिल प्रमाणे-

१) पोलिस महासंचालक यांचे वरिष्ठ सहाय्यक २) पोलिस महासंचालक यांचे उपसहायक ३) प्रशासकीय अधिकारी ४) वरीष्ठ कार्यालय अधिक्षक ५) कार्यालय अधिक्षक ६) प्रमुख लिपिक ७) वरीष्ठ श्रेणी लिपिक ८) कनिष्ठ श्रेणी लिपिक ९) वरिष्ठ स्विय सहाय्यक १०) स्विय सहाय्यक ११) उच्च श्रेणी लघुलेखक १२) निम्न श्रेणी लघुलेखक १३) लघु टंकलेखक १४) नाईक कार्यालयीन शिपाई १५) कार्यालयीन शिपाई १६) प्रमुख आचारी १७) सहाय्यक आचारी १८) भोजन सेवक १९) न्हावी/बारबर २०) धोबी २१) मोची २२) शिंपी २३) सफाईगार/ स्विपर २४) माळी २५) सुतार २६) गवंडी २७) प्लंबर/नळ कारागिर २८) पंप अटॅडन्स २९) पाणी वाहतुकदार/पाणक्या ३०) मजदुर ३१) मेल सर्व्हंट ३२) चौकिदार ३३) ड्रेसेस/व्रनोपचारक ३४) दप्तरी ३५) रूग्णालयातील शिपाई ३६) विजतंत्री ३७) जोडारी ३८) रंगारी ३९) आया ४०) वार्ड बाॅय/कक्षसेवक ४१) व्हाल्व्ह मॅन ४२) रूग्णालय सेवक ४३) कुकमेट आणि ४४) डिस्पेंन्सी सर्व्हंट/पुरूष सहाय्यक अशाप्रकारे गट ‘अ’ ते गट ‘ड’ संवर्गातील पदे सरळ सेवाभरती करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रहविभागाकडुन शासन निर्णय क्रं.संकिर्ण – ०२२१/प्र.क्रं.१२७/पोल ५ब दि ११ जुन २०२१ रोजीच्या परीपत्रकानुसार दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्यात आले आहेत.

आणि याच निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी पोलिस महासंचालकासह गृहविभाग आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत तसेच नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार दिव्यांगांनी पोलिस खात्यात भरती होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी वाढविण्याचे आवाहन राहुल साळवे यांनी केले आहे.