वेल्हाणे गावात आठ दिवसानंतर पावसाची हजेरी

54

✒️प्रतिनिधी धुळे(जयदिप लौखे-मराठे)

धुळे(दि.16जून):- तालुक्यातील वेल्हाणे गावासह संपूर्ण तालुक्यात आठ दिवसापासून पूर्णतः गायब झालेल्या पावसामुळे दि.16 जून रोजी हजेरी लावली.वेल्हाणे येथे आठ दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकांचं बियाणं लावून दिल्यानंतर शेतकरी खूप संकटात आला होता. त्यानंतर आज शेतकरी खूप सुखावल्याचे चित्र या पावसामुळे दिसून येत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी पाऊस आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करीत देवाचे आभार मानले.धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकऱ्यांनी पाऊस आल्यानंतर आता पुढील कामांना उद्यापासून सुरुवात करण्याची तयारी केली.