प्रेमभंगातुन वणा नदीपुलावरुन नदीत उडी

34

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१६जून):-स्थानिक शास्त्री वार्ड येथील २० वर्षीय युवतीने प्रेमभंगातुन वणा नदीपुलावरुन नदित उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने काही नागरिकांच्या नजरेस ही बाब आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या युवकांनी धाव घेऊन त्या युवतीचे प्राण वाचविले.सदर युवतीचे चंद्रपुर जिल्ह्यातील युवकाशी प्रेम होते,परंतु त्याने लग्नासाठी नकार दिल्याने सदर युवती निराश झाली,निराशेपोटी तिने आज सकाळी १० वाजताचे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वेणा नदीवरील पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली.

परंतु काही सुज्ञ नागरिकांनी नदीपात्रात मासे करणाऱ्या मच्छीमाराना याची लगेच माहिती दिली,मच्छीमारांनी धाव घेऊन त्या युवतीला लगेच पाण्याबाहेर काढले.उपस्थित नागरिकांनी लगेच रुग्णवाहिका बोलावून युवतीस उपजिल्हा रुग्णालयात पाठविले,तेथील डॉक्टरांनी युवतीस वर्धा येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले.सदर युवतीचे वडील यापुर्वीच मृत पावले असून तीची आई व एक भाऊ असा परिवार आहे.
सदर प्रकरणी पुढील तपास पोहवामहेंद्र आकरे करीत आहे.