ओबीसींचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा – गोविंद यादव

24

🔹आरक्षणासाठी गंगाखेडला रास्ता रोको

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17जून):- सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी आरक्षण हा न्यायालयाआडून ओबीसींचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव आहे. ओबीसी एकजूटीतून तो हाणून पाडावा, असे आवाहन कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. आरक्षणासाठी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण नुकतेच रद्द केले आहे. यावरून ईतर मागासवर्गीय समाजात तीव्र नाराजीची भावना आहे. हे आरक्षण परत देण्यात यावे, या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत गंगाखेड येथील परळी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ओबीसी संघर्ष समितीचे संयोजक, तथा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, निमंत्रक तथा शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश ऊपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, रासपाचे सुरेशदादा बंडगर, धनगर साम्राज्य सेनेचे नारायणराव घनवटे, माजी ऊपसभापती माधवराव शेंडगे, नगरसेवक तुकाराम तांदळे, सुवर्णकार समाजाचे तालुकाध्यक्ष विजय डहाळे, तुकाराम मैड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, नाभिक सेनेचे बालासाहेब पारवे, माजी सरपंच गोविंद लटपटे, मेजर प्रल्हाद मुंडे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नागेश डमरे, माळी महासंघांचे परसराम गिराम, सदाशीवराव कुंडगीर, राहुल फड, ऊद्धव शिंदे, मनोज मुरकुटे, रंजीत शिंदे, गजानन आंबेकर, शाम ऊदावंत, ईंद्रजीत हाके, ऊत्तमराव व्हावळे, बाळासाहेब सोनटक्के आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेली ओबीसी जनगणना तात्काळ करावी, अशी मागणी गोविंद यादव यांनी याप्रसंगी केली. तर मनसेच्या बालाजी मुंडे यांनी ओबीसींचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण आवश्यक असल्याचे सांगीतले. ते न मिळाल्यास भविष्यात ओबीसींच्या भावनांचा ऊद्रेक होईल, असा ईशारा मुंडे यांनी दिला. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.