कोरोना काळात कर्तव्य बजावणार्‍या आशा स्वयंसेविका मानधनापासून वंचित

    46

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

    गेवराई(दि.18जून):-कोरोना काळात स्वरक्षणासाठी कुठलेही साहित्य नसतांना आशा स्वयंसेविका आणि गटप्रर्वतक यांनी गावागावात जावून सर्व्हे केला. त्यांचे रोकॉर्ड ठेवले, कोरोना लसीकरण मोहिमेत भाग घेवून ग्राऊंड लेवल काम केले.
    क्वारंटाईन कॅम्पमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कर्तव्य पार पाडले. महामारीत शासनाला मोठी मदत केली. मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही शासनाने मान्य न केल्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यू दर रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली होती.

    या कामामध्ये आशा स्वयंसेविकांचा सक्तीने समावेश करण्यात आला होता. त्यात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जावून विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. त्यांचा सर्व्हे केला, त्याचे रेकॉर्ड ठेवले, कोरोना लसीकरण कॅम्पमध्ये हजर राहून कामे केली यासह आदी जबाबदार्‍या आशा स्वयंसेविकांनी पार पाडल्या. तसेच त्या व्यतिरीक्त त्यांना नियमीतपणे नेमुण दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागली. त्यामुळे सदर कामाचा अतिरीक्त बोजा त्यांच्यावर पडला. मार्चपासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाई कॅम्प येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत डिवटी लावण्यात आली.