प्रस्थापितांना सोडून बहूजनाची वंचितकडे धाव

  78

  ✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

  खामगाव(दि.18जून):- येथे रमिंदरसिंग पोपलीसह अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश।।खामगाव प्रतिनिधी:वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरीत होऊन खामगाव शहरातील रमिंदरसिंग पोपली, विशाल तायडे सह अनेकांचा वंचित बहूजन आघाडीत पक्ष प्रवेश झाला. स्थानिक पत्रकार भवन येथे मंगळवारी वंचित बहूजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

  यावेळी राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार,जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महासचिव ऍड. अनिल ईखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, नगरसेवक विजय वानखडे राजेश हेलोडे यांची उपस्थिती होती. यावेळी खामगाव शहरातील रमिंदरसिंग पोपली, गुरुकृपा ट्रान्सपोर्ट चे संचालक मोनूसिंग सलूजा,चरणजितसिंग सलूजा ,विशाल तायडे, दिनेश चंदेल, अमोल चौकसे, दिपक महाजन यांच्यासह खामगाव शहरातील तसेच इतर तालुक्यातील अनेकांनी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश घेतला. प्रवेश घेणाऱ्या सर्वांचे अशोक सोनोने, शरद वसतकार,गणेश चौकसे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, वंचितचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

  यावेळी अशोक सोनोने यांनी वंचित हा सर्वसामान्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणारा एकमेव पक्ष असल्याचे सांगून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचितमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. यापुढेही अनेकजण वंचित मध्ये प्रवेश घेणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

  कार्यक्रमाला माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव, विक्रम नितनवरे, दादाराव हेलोडे,नितीन शर्मा, महिला आघाडी शहराध्यक्ष रत्नमाला गवई, प्रमोदिनी लांडगे, रमाताई गवई,वहिद जामा, गोलू महांतो,संजय खंडेराव, हर्षवर्धन खंडारे, विष्णू गवई, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संचालन नितीन सूर्यवंशी यांनी केले. कोरोना नियमांचे पालन करीत मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.।।