नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजुर करून इफको टोकीयो कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करा-शेतकरी पुत्र नायगाव

30

✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.१८जुन):-नायगांव ( बा ) तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० सालचा सोयाबीन,मुग,उडीद,कापुस,ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा इफको टोकीयो कंपनीकडे नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरला होता पण सोयाबीन व तुर पिकाचे मोठे नुकसान होऊनही नायगाव तालुक्यातील सर्व महसुल मंडळे बाधीत क्षेत्र घोषीत असतानाही पिक विमा नामंजुर झाल्याने शेतकऱ्यात प्रचंड संतापाचे वातावरण असुन यात तहसिलदार महोदयांनी तात्काळ लक्ष घालावी अशी शेतकरी पुत्रांची मगणी आहे. आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य पुणे ०५/०३/२०२१ च्या पत्रान्ववे महसुल जिल्हा कृषी परिषद विभागामार्फत ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रात पंचनामे करण्यात आला.

नायगाव तालुक्यातील फक्त स्थानिक नैसर्गीक आपत्ती ४०८४ शेतकऱ्यांना फक्त ३ कोटी ५६ लाख ४४ हजार ४२६ रूपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाई १२१४ शेतकऱ्यांना ९६ लाख ६ हजार ४४४ रूपये उत्पन्न आधारे २९८९ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख ८६ हजार १०३ रूपये इतकी तुटपुंजी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांचा थटा करणाच्या प्रकार इफको टोकीयो कंपनीने केला असुन काही शेतकऱ्यांना का? पिकवीमा भरते वेळी शेतकऱ्यांना वेगळीच भुलपाथा इफको टोकीयो कंपनी दिल्याने त्यांचा प्रेमळ आश्वासनाला शेतकरी मायबाप कोरोना महामारीत फसले असुन त्यामुळे माझ्या शेतकरी मायाबापाची फसवणुक केल्याप्रकरणी इफको टोकीयो कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करा अश्या अशयाचे निवेदन नायगाव येथील शेतकरी पुत्र माणिक चव्हाण,विठ्ठल बेळगे,अविनाश अनेराये,नवनाथ जाधव,सुनिल शेळगावे,सचिन गायकवाड, अभिजीत मंगरूळे, शिवराज चव्हाण,अविनाश मोहीते, जयकांत कानोले व तालुक्यातील इतर शेतकरी पुत्र उपस्थीत होते.