अवैध दारुसाठ्यासह १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

31

🔺ब्रम्हपुरी पोलीसांची धडक कारवाई

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18जून):-ब्रम्हपुरी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैद्य दारुसह १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवैद्य दारूविक्री सुरुच असुन अवैद्य दारुतस्करी सुध्दा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील उचली गावाजवळील रस्त्याच्या बाजुला झुडपी जंगलात अवैद्य दारुचा साठा ठेवला असल्याची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना मिळताच पोलीसांच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली.

तेव्हा त्याठिकाणी असलेले दोन्ही आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. तेव्हा पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी चार पोत्यांमध्ये १ लाख ४८ हजार रुपये किंमतीची १४८० नग देशी दारू व ५० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी सापडून आली.
असा एकुण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यामध्ये समीर ढोंगे(वय २०) रा. उचली व हेमंत लोखंडे (वय २९) रा.हनुमान नगर ब्रम्हपुरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मीलींद शिंदे,पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकुश आत्राम, पोलीस हवालदार रामटेके, मुकेश गजबे, प्रकाश चिकराम यांनी केली आहे.