🔸क्रेन्द्र सरकार दिल्ली व राज्य सरकार मुंबई कडे निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)

उमरखेड(19जून):- पेट्रोल डिझेल यांच्या किमतीत सतत वाढ होत असल्यामुळे वाढत्या किमती कमी करण्यासाठी मा .केंद्र सचिव पेट्रोलियम विभाग भारत सरकार न्यू दिल्ली व मा .सचिव विक्रीकर विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना AIMIM पक्षाचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक उमरखेड तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले .

मागील दीड वर्षापासून कोरूना मुळे अनेक लोकांचे व्यवहार बुडाले अनेकांचा रोजगार गेला उद्योगधंदे बंद पडले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशा बिकट परिस्थितीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे त्यातच शासनाने पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतीत वाढून यात अधिकच भर टाकली आहे. त्यामुळे उमरखेड येथील एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती मध्ये 25% किंमत कमी झाली पाहिजे याकरिता निवेदन देण्यात आले. सदर निवेदन एम आय एम पक्षाचे एजाज जनाब सर यांच्या हस्ते तहसील कार्यालय उमरखेड येथे देण्यात आले याप्रसंगी नगरसेवक रसूल पटेल यांनी वाढत्या महागाई विरोधात आपले विचार मांडले.

तसेच जलील कुरेशी (नगरसेवक), मुजीब बागवान (नगरसेवक), सय्यद अफसर (नगरसेवक), प्रतिनिधी इरफान खान, प्रतिनिधी शेख वसीम, सय्यद इरफान भाई (माजी जिल्हाप्रमुख) यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी अजिज पटेल, सिद्दिक राज, वजाहत मुजावर,अखिल कुरेशी, परवेज अहमद,शेख असलम,शबिरुद्दीन इत्यादी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED