🔹डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा उपक्रम

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

नेरी(दि.19जून):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात १४ एप्रील २१ ला साजरी झाली. या जयंती निमीत्त राज्यातील अनुसुचित जाती -जमाती चे जीवनमान प्रकाशमय करण्याच्या दृष्टीकोनातुन विज जोडणी विशेष मोहीम १४ एप्रील ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राबवीन्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना अंतर्गत अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातील जिवण प्रकाशय होनार आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शोषीत व उपेक्षीतांचे मुक्तदाता म्हणून सुपरिचित आहेत. विपरीत परिस्थितीत देश व विदेशातुन उच्च शिक्षण घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

याच शिक्षणाच्या बळावर शोषीत, उपेक्षीत घटक व एकुणच भारतीयांच्या जीवनात अनेक क्रातीकारक बदल घडून आणले. एकप्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली. १४ एप्रिल २१ ते ६ डिसेंबर २१ अनूसुचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावीतरण व्दारे घरगुती ग्राहकासाठी विज उपलब्ध करून देन्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजना राबवीन्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनुसुचित जाती जमाती घटकातील प्रवर्गाचे जिवण प्रकाशमय होनार आहे. याशिवाय याच कालावधीत योजनेत अनुसुचीत जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटीत उद्योगातील विज पुरवठ्या संबधी तक्रारी समस्या विषयी निवारण करण्यात येनार आहे. तक्रारी चे निवारणासाठी महावितरण समर्पित वेब पोर्टल तयार करण्यात येनार आहे.

या योजने चा लाभ घेन्यासाठी अनुसुचित जाति जमाती प्रवर्गातील लार्भाथ्याला पाचशे रुपये इतकी अमानत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करने अथवा सदर रक्कम पाच समान मासीक हप्त्यामध्ये विज बिलातुन भरन्याची सुविधा मिळनार आहे. या योजनेत सध्या महावितरणकडे विज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबीत असलेल्या अनुसुचित जाति व अनुसुचित जमाति लाभार्थी अर्जदाराचा सुद्धा विचार करण्यात येनार आहे.

महावितरण व्दारे प्राप्त अर्जानुसार ज्या लाभार्थी अर्जदाराच्या घरी विज जोडणी नाही अशा लार्भाथ्याना विद्युत पायाभूत सुविधा असल्यास कार्यालयीन15 दिवसात विज जोडणी उपलब्ध करून देन्यात येनार आहे. मात्र अर्जदाराने अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. ज्या लाभार्थ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यांचे जाती प्रमाणपत्र आहे, अशाच प्रवर्गातील घटकांना योजने चा लाभ घेता येणार आहे. व त्यांचेच जिवन प्रकाशमय होणार आहे.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED