भैरव भोसले सामाजिक प्रतिष्ठान कडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

30

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.19जून):-दिनांक १८ जून २०२१रोजी शिरूर कासार तालुक्यातील येवलवाडी या गावातील संपूर्ण गोरगरीब विद्यार्थ्यांना भैरव भोसले सामाजिक प्रतिष्ठान कडून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी येवलवाडी व वंजारवाडी या गावचे सरपंच येवले तसेच जालिंदर विद्यालय रायमोह चे प्राचार्य खोले सर,प्राध्यापक शेख सर,सहशिक्षक सानप सर,राठोड सर,पवार सर,वारे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य खोले यांनी कोरोना च्या काळातील शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी समजून सांगितल्या व यापुढे शिक्षण कसे घ्यावे याबद्दल माहिती सांगितली.यावेळी प्राध्यापक शेख सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मात कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राठोड सर व प्रतिष्ठान चे आभार मानले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी भैरव भोसले सर यांनी यापुढेही विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शैक्षणिक साहित्य,शालेय गणवेश देण्याचे आश्वासन दिले.