✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.१९जून):- गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात लॉक डाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. राज्यातील नाट्य, चित्रपटगृह बंद असल्याने बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावसर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

सरकारकडून वेळेवर मदत मिळत नाही. अश्या वेळेस त्यांनी काय करावे. संपूर्ण नाटय व्यवसायावर अवलंबून असलेले हे नाट्यकर्मी, त्यांनी आपले कुटुंब कसे राखायचे, जगवायचे. नाटकाचा प्रयोग असला तरच त्यांना पैसे मिळतात. नाटयनिर्माता, संस्था, कलावंत काही दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात दिला. मात्र काही महिने वगळता लॉक डाऊन सातत्याने चालू आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून लॉकडाऊन असल्याने नाट्य, चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा, अभिनेत्री नयन पवार यांच्यावतीने शिवाजी मंदिर या नाट्यगृहातील बॅकस्टेज कलाकार, डोअरकीपर यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर, दिलीप दळवी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED