✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.19जून):- राजूर पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती वरून दारूच्या नशेत असलेल्या आपल्याच नातवाने दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशाने आजीचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करून पसार झालेला आरोपी सुनील मंगळा पदमेरे याच्या बुधवारी रात्री खून झाल्याच्या अवघ्या ४८ तासांत मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी हा खून करून तो त्याच्या बहिणीकडे टाकेद या ठिकाणी पसार झाल्याचे राजूर पोलिसांना समजता राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,यांच्या सह दोन पथकांनी तातडीने टाकेदच्या दिशेने धाव घेत आरोपी यांस टाकेद येथून बहिणीच्या राहत्या घरातून ताब्यात घेत त्यास जेरबंद केले.

या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत अकोले पोलीस ठाण्याचे आनंद मैड,गणेश शिंदे, राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार देविदास भडकवाड,प्रवीण थोरात,दिलीप डगळे,कैलास नेहे,राकेश मुळाने,विजय मुंढे,विजय फटांगरे,मनोहर मोरे,होमगार्ड सोमनाथ उगले आदींनी उत्तम कामगिरी बजावली.

क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED