गरिब पत्रकाराला दोंडाईचा पोलिसांनी तीन महिन्यातच मिळवून दिला हरवलेला मोबाईल

32

🔹लोकांचे पन्नास हजाराचे चार मोबाईल मिळवून दिल्याने,मोबाईल गहाळ झालेल्या इतरांच्याही आशा झाल्या पल्लवीत…

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.19जून):- येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी तीन महिन्यांनपासुन मोबाईल हरवल्याचा दाखल असलेल्या गरिब पत्रकार श्री दौलतराव सुर्यवंशी ह्यांच्या तक्रारीला पंधरा दिवसांत न्याय देत आठ हजार रूपये किमंतीचा रिअल-मी कंपनीचा मोबाईल सायबर क्राईम विभाग,धुळेची मदत घेत मिळवून दिला. तसेच सोबत गावातील इतर चार जणांचे हरवलेले पन्नास हजार रूपयांचे मोबाईल ट्रँक करून मिळवून दिल्याने तिवारी साहेबांच्या कार्यतत्पर कामाचे गावातुन कौतुक केले जात आहे. तसेच इतर लोकांचेही अनेक महिन्यांनपासुन मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्रलंबीत असुन त्यांच्याही आशा तिवारी साहेबांकडून आता पल्लवीत झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील गरिब पत्रकार दौलतराव लक्ष्मणराव सुर्यवंशी यांचा आहिल्याबाई शाँपींगमधुन डी.एस.आँईल डेपो अँन्ड स्पेअर पार्टस ह्या दुकानतुन ०१/०३/२०२१ रोजी म्हणजे तीन महिन्यापासून रिअल-मी कंपनीचा आठ हजार रूपये किमंतीचा मोबाईल चोरी पल्स गहाळ झालेला होता. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिनांक ०४/०३/२०२१ रोजी गहाळ रजिस्टर नंबर ३१/२०२१ नुसार नोंद करत रितसर तक्रार दाखल करण्यात आली. ह्या घटनेला जवळपास तीन महिने उलटून जात असताना फिर्यादी हे नेहमी गोपनीय व स्थानिक सायबर क्राईमचे काम पाहणारे पोलीस नाईक राकेश खांडेकर यांच्याशी वारंवार संपर्क करत मोबाईल ट्रँक बाबत चर्चा करायचे. मात्र मोबाईल ट्रँक व्हायला काही यश मिळत नव्हते. त्यातच तिवारी साहेबांपर्यत हा विषय गेल्याने त्यांनी त्या गरिब पत्रकाराची बाजु समजुन, आताचे वुत्तपत्र दुनीयेत मोबाईलला आलेले महत्त्व समजले व पत्रकाराला धीर देत. तुमचा रिअल-मी कंपनीचा मोबाईल लवकरच ट्रँक करत परत तुम्हाला मिळवून देण्यात येईल, असे आश्वासित केले व पंधरा सतरा दिवसातच मोबाईल ट्रँक करत मिळवून दिला.तसेच सोबत गावातील इतर चार लोकांचे पन्नास हजाराच्या आतील एकूण किमंतीचे चार मोबाईल संबधित मोबाईल धारकांना परत केल्याने पोलीसांच्या कामगिरीचे गावातुन कौतुक केले जात आहे.

सध्या प्रत्येक माणसाच्या दैनंदिन व्यवहार जीवनात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. एकवेळ माणूस जेवणाशिवाय राहू शकतो.पण एक दिवस मोबाईल शिवाय राहू शकत नाही. त्यातच प्रत्येक माणसाला महागडे मोबाईल वापरायची सवय झाली असल्याने,अशातच हे मोबाईल चोरीला गेले किंवा गहाळ झाले तर त्या तक्रांरीचे निरसन करणे पोलीसांपुढे डोकेदुखी झाले आहे. म्हणून वर्षाकाठी हजारो तक्रारी़चा ढिग पोलीस दप्तरी पडलेला असतो. मात्र दोंडाईचा पोलीस स्टेशनला लाभलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी हे यायला तीन महिने होत नाही.त्यातच त्यांचे व गोपनीय पोलीस नाईक राकेश खांडेकर यांचे सायबर क्राईम तक्रारी हाताळण्याचे काम पाहून मागील पंधरा दिवसात गावातील पाच लोकांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले असल्याने आता गावातील इतर ज्यांचे मोबाईल हरवले आहेत. त्याच्यांही आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.