महिला काँग्रेस ने महागाई विरोधात आंदोलन करून केंद्र सरकारला सत्ते वरून खाली खेचण्याचा केला निर्धार

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19जून):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेस चे नेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व बल्लारपूर महिला काँग्रेस च्या वतीने वाढत्या महागाई विरोधात बल्लारपूर नगर परिषद जवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी महिलांनी उपस्थित लोकांना बिन तेलाच्या फोडणीच्या वरणाचे डब्बे वाटले. सिलिंडर ची किंमत ९०० रुपयांच्या आसपास वाढली आहे तर डाळींची किंमत १२० रुपये झाली आहे, खाद्य तेलाची किंमत सुद्धा भरमसाठ वाढलीआहे.

या महागाई चा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात महिला काँग्रेस कडून आंदोलन करून मोदी सरकारला खाली खेचण्याचा संकल्प महिलांनी राहुल गांधी यांच्या जन्मदिनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, बल्लारपूर शहर काँग्रेस च्या अध्यक्षा मेघा भाले, बल्लारपूर तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद यांनी केले.

या वेळी महिलानी ‘राहुल जी को लाना हैं, मेहंगाई घटना हैं अशा घोषणा दिल्या.मोदी सरकार च्या जनविरोधी धोरणा विरोधात महिला काँग्रेस या पुढे देखील वेळोवेळी आंदोलन करत राहणार अशी प्रीतिक्रिया या वेळी नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सल्लागार डॉक्टर रजनी हजारे,नगरसेविका मीना बहुरिया,छाया मडावी,छाया शेंडे , महिला उपाध्यक्ष ज्योती बहुरिया,सचिव प्रियंका नाईक, अनिता तेलंग ,बबिता बाजपेई या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.