✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.19जून):-तालुक्यात सन २0१९,२0२0 साली गारपिटी मुळे मोठ्या प्रमाणात फळ बाग व ईतर पिकाचे नुकसान झाले होते. त्याचा पीकविमा देन्याची मागणी निवेदनाव्दारे अॅड.सुरेश हात्ते यांनी केली आहे. या बाबत अधिक माहीती आशी की गेवराई तालुक्यातील शेतक-यांचे सन २०१९,२०२० साली गारपिटी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या संदर्भात गेवराई तालुक्यातील तलवाडा गावचे माजी जि.प. सदस्य बीड यांनी जिल्हाकृर्षी आधिकारी बीड व गेवराई तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली असुन मोठ्या प्रमाणात गारपिट झाल्याने शेतकरी आर्थिक आडचणीत सापडल्याने त्यास सन २०१९,२०२० सालीचा पीकविमा लवकर देन्यात यावा नसता आठ दिवसा नंतर तीव्र स्वरुपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आसा इशारा निवेदनाच्या शेवटी अॅड.सुरेश हात्ते यांनी संबधित प्रशासनाला दिला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED