भोजगाव येथे शेताच्या वादातून तरुणास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

    40

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

    गेवराई(दि.19जून):- गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे शेताच्या वादातून तरुणास रस्त्यावर गाठून लोखंडी गजाने व पाईपाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि, १८) रोजी संध्याकाळी च्या सुमारास घडली तरूण हा संध्याकाळ च्या सुमारास आपल्या रोजी प्रमाणे घरी येत असताना एकट्यास गाठून तीन जनांनी पेट्रोल टाकून जाळून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तरूणाचे वडील त्या ठिकाणी होते त्यांच्या हातातील काड्यांची पेटी हिसकावून बाजूला फेकली मारहाण केल्याचे नावे संदिपान भानुदास संत, सुदर्शन संदिपान संत, प्रदर्शन संदिपान संत हे त्यांचे नावे आहेत.

    सविस्तर असे की.. सदीपान भानुदास संत आणि नितीन संत या दोघांमध्ये काही दिवसांपासून शेतावरून भांडण चालू होते नितीन संत यांनी ज्यांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध पाच तक्रारी गेवराई पोलीस स्टेशनला दिल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे काल ७ च्या सुमारास एकट्याला गाठून जबर मारहाण करण्यात आली.

    जखमी असलेल्या व्यक्तीला आधार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले संबंधित व्यक्ती आधार हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. नितीन संत हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती चे नाव आहे परंतु गेवराई पोलीस अद्याप त्या ठिकाणी जॉब घेण्यासाठी गेले नाही अशी माहिती समोर आली आहे