_अठरा विश्वे दारिद्र्याचा सामना करत आपल्या प्रामाणिक -निडर -सत्यवादी आचार -विचारांच्या जोरावर_ _परिस्थीतीला शरण न‌ जाता काळाच्या छाताडावर पाय ठेवून आजही उभा असलेला झंझावात म्हणजे पाटोदा येथील श्री दिगांबर वाघोजी ढवळे ..४० वर्षांपूर्वी आपल्या_ _गुणवत्तेने-क्षमतेने राजकिय सामाजिक क्षेत्रात स्वतःच अस्तीत्व निर्माण करणार्या दिगांबर ढवळेंच्या जिवानाचा आलेख निश्चीतच सर्वांना मार्गदर्शक असाच आहे ….९० च्या दशकात नांदेड लोकसभेचे उमेदवार स्वर्गीय दिगांबरराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शानात विविध लोकोपयोगी कार्य केली.

_स़ंकटांना न‌डगमगता -स्व स्वाभिमानाला धक्का न लागू देता ,काळाची पावलं ओळखत -शिक्षनाच महत्व जाणून दोन्ही मुलांना उच्च विद्याविभूषीत करत_ _पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दारिद्र्याचा कायमचा नायनाट केला_._त्यांच्या धाकट्या मुलाने_ _अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले असून वडील मुलाने मुंबई येथून अभियांत्रीकी सोबत कायद्याची पदवी मिळवली आहे . आज त्यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या जिवन पटावर थोडक्यात टाकलेला प्रकाश -_

_*आंबेडकरवादी चळवळ तसेच समाजसेवेसाठी गेली ३६ वर्ष सक्रियपणे कार्यरत असलेल्या या उपेक्षित “वादळाचा” थोडक्यात आढावा –*_

_१) *नामांतर लढ्यामध्ये एस एम प्रधान, गंगाधर गाडे, मनोज भाई संसारे यांच्या सोबत दिल्ली पार्लमेंट वर काढलेल्या मोर्चात सक्रिय सहभाग घेतला ,त्यात मथुरा येथे १ महीना जेल झाली..*_

_२) *नामांतराच्या लढ्यात मराठवाड्यात जातीवाद्यांकडून केले गेलेल्या जाळपोळळीत प्रा नरेंद्र गायकवाड यांच्या सोबत ३०० गावात पायी फिरून समाजाला धिर दिला, आधार देण्याचा प्रयत्न केला ..*_
_३) *१९९८ ला ग्रामपंचायत पाटोदा उपसरपंच पदी निवड..*_

_४) *१९९९ ला मुदखेड विधानसभा निवडणुक लढवून प्रस्थापितांना घाम फोडला.*_

_५) *दै देशोनत्ती तसेज दै पुण्यनगरी ला पत्रकार म्हणून १० वर्षे काम केले..*_

_६) *आंबेडकरवादी समाज व मतदार ईतरत्र विखरू नये म्हणून २०१७ मध्ये भारिप बहुजन महासंघातर्फे पंचायत समिती स्वाभिमानाने निवडणूक लढवीली*_

*_६) *मे २०१८ मध्ये माणुसकी सेवाभावी संस्थे ची स्थापना करून त्या अंतर्गत महाराष्ट्र भर खालील उपक्रम राबविले.._*

*_अ)दरवर्षी दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम राबविले जातात.._* _
_ब) *आँगस्ट २०१८ मध्ये सांगलीत आलेल्या महापुरात माणुसकी म्हणून, अंकलखोप व भिलवडी (ता पलूस, जि सांगली ) गावात जवळपास ३०० कुटुंबाना २किलो सम्राट आटा देण्यात आला..*_
_क) *२९ आक्टोबर २०१९ ला बेरोजगार आणि त्यावर उपाय यावर मार्गदर्शन पर कार्यक्रम ठेवून नामांकित मार्गदर्शक बोलावले ,*_
_*तसेच विविध सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्यात आला..*_

_7) *कोरोणा महामारी च्या अत्यंत नाजूक काळात नायगांव ताल्युक्यातील तब्बल 5000 कुटूंबाना नामांकित कंपनीचा साबण वाटप करून घरोघरी जाऊन जनजागृती अभियान ला मार्गदर्शन करत ऊपक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली…*_
_*नांदेड परिसरातील सामाजिक कार्यांचा केंद्रबिंदू असलेल्या आयु दिगांबर ढवळे -सामाजिक तसेच काही काळ राजकीय पटलावर आगळी वेगळी ओळख निर्माण केली परंतु नेहमीच प्रसिद्धी पासून दूर राहने पसंद केले…*_
_*20 जून 1958 जन्मलेल्या आयु दिगांबर ढवळे यांनी अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा आपला आयुष्यातील बहूतांश आणि महत्वपूर्ण असा 35 वर्षाचा काळ केवळ* *सामाजिक कामांत… अडल्या नडल्या च्या अडचणी सोडवण्यात…*_ _*पिडीतांच्या दुखाःत सहभागी होऊन धीर देण्यात व्यतीत केला असून आजही तेवढ्याच तळमळीने गरजूंना मदत करत असतात …*_ _*समाजाचा गाडा ओढत असताना मुलांच्या शिक्षणासाठी कधीही तडजोड न करता उच्चशिक्षित केले ..*_
*_आज वयाच्या ६४ व्या वर्षी सुद्धा २ मेजर सर्जरी झालेल्या असताना सुद्धा राजकिय आणि समाजकार्यात हिरीरीने भाग घेत सामान्यांच्या अडी-अडचणींना सोडवत असतात_*
_*अशा या वादळला ६४ व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा..* *पुढील आयुष्य सुख- समृद्धी -समाधान- भरभराटीचे आणि आरोग्य दायी जावो…..*_💐💐💐💐

*_-साभार -_*
*_शेख सायबन सर -_*

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED