✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21जून):-चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे १९४५ ते १९५० पासुन शेतकरी शेतीची मशागत करून आपले उदरनिर्वाह करून आपल्या पाल्यांना जगवत आहे, त्यांचे जमीनीचे नव्याने सर्वे करून भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमिन पट्टे देण्यात यावे अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली.

पालकमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ५० ते ५५ वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटून सुध्दा आता पर्यंत आम्हाला आमच्या शेतमालकिचे हक्काचे जमिन पट्टे मिळालेले नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनेपासुन भूमिहीन शेतकरी वंचित राहत आहे.

कारण जिवती पहाडावर कोणतेचा उद्योग नाही मग यंत्री महोदय आम्ही शेतकरी कसे जगायचे व आमच्या मुला-बाळांचे भविष्य कसे घडवाचे सांगा आता शिक्षणासाठी सुध्दा सात बाराची अट सरकारने सुध्दा लादली आहे. म्हणुन विद्यार्थी सुध्दा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या जिवती तालुक्यातील मुलांवर आली आहे. मंत्री मंडळामध्ये हा मुद्दा मांडुन कायदयामध्ये दुरुस्ती करून तीन पिढयांची अट रद्द करून सरकारनी भूमिहीन शेतकन्यांना तात्काळ न्याय मिळवून द्यावे,अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तिव्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED