मृग महिना सुरु झाला की पाऊस सुरु होतो. पावसाची सुरवात झाली कि शेतकऱ्याच्या मनांत डोक्यात अनेक चक्र फिरणे सुरु होतात. निसर्गाने माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत? याचा विचार आजकाल उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे लोक आणि मध्यम वर्गीय लोक करीत नाही.त्यांचे आर्थिक ताळेबंद पक्का असतो.पण शेतकरी तसे करू शकत नाही कारण पाऊसाने धोका दिला तर?.हे खूप मोठे संकट शेतकरी छातीवर घेऊन जगत असतो.
आर्थिक संकट येऊ नये म्हणून शेतकरी नेहमी सतरा प्रकारची धान्य पेरतात. कारण बाजारभाव असलेली व भरघोस उत्पन्न देणारी एक-दोन पिके बाजारात गेल्यावर खाली पडतात. निरक्षर असलेल्या शेतकर्यांना या गोष्टीची पूर्ण माहिती असते. याबद्दल त्याचं पिढीजात शहाणपण आजही अतिशय महत्वपूर्ण ठरतं.
पाऊस सुरु होण्या अगोदर शेतकऱ्यांच्या डोक्यात यंदा काय पेरायचं? हा प्रश्न उभा राहतो. गेल्या वर्षी सोयाबीनला मार्केट चांगलं होतं. म्हणून पूर्ण वावरात सोयाबीन पेरणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. वडिलोपार्जित शेत करणारा कधी असा निर्णय घेत नाही.तो एकच वेळी चार पिके घेतो.मुंग,उडीद आणि हायब्रीड ज्वारी,एक तास हायब्रीडचे दोन तासे उडीद मुंगाचे दहा बारा तासा नंतर एक तास तूर पेरतो. काही शेतकरी पराठी मध्ये उडीद,मुंग,तुरीचे एक तास पेरत असतात.गेल्या वर्षी कोणत्या पिकाला जास्ती बाजारभाव होता हा एक महत्वाचा मुद्दा असतो. कृषी उत्पन्न बाजार हे शेतीत काय पेरायचं हे ठरविण्याच्या शेतकर्याच्या निर्णयाला प्रभावित करीत असतात. यावर्षी किती व कसा पाऊस असणार हाही मुद्दा तितकाच महत्वाचा असतो.
विदर्भातील भेंडवळची पिक,पाणी मांडणी पारंपारिक पद्धतीने चौथा पाचव्या पिढीत आजही कायम आहे. मात्र त्या-त्या वर्षाच्या पावसाचे प्रमाण व स्वरूप याबद्दलचे अभ्यास,अंदाज हे शेतकर्यापर्यंत नीटसे पोहचत नाहीत.गावागावातील वेगवेगळ्या जुन्या प्रथा, परंपरा, समज यानुसार पावसाचे अंदाज बांधले जातात. प्रत्येक राज्यात असे अशिक्षितपण पारंपारिक ज्ञान असलेले शेतकरी आहेत.
तेलंगाना राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथील एक साधू दर वर्षी शेतीत काय पेरायचं याची यादी देतात. या वर्षी कोणते पिके चांगले येणार, भरघोस उत्पन्न देणार, हे त्यांना कळतं असेही, काही लोक दावा करतात.पण काही शेतकरी भांडवली ब्राम्हणी बनिया वृत्तवाहिन्या,प्रिंट मिडीयाच्या बी,बिवायी,खताच्या जाहिरातबाजीला बळी पडतात.त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होते.
दिल्लीच्या तिन्ही सीमेवर जे शेतकरी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करीत आहेत, त्यांची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे. ज्या ज्या देशात मानवता जीवनात आहे त्या त्या देशातील सद्विवेकबुद्धी असलेल्या माणसांनी सेलिब्रिटी नी शेतकरी आंदोलन बाबत दुःख व्यक्त केले.पण भारतातील तीन टक्के समाजाच्या लोकांची मनुवादी मानसिकता मानवतावादी कधीच दाखविली नाही.त्यांनी रामाच्या नांवाचा वापर करून मराठा,ओबीसी मागासवर्गीय आदिवासी समाजाला कट्टरपंथी बनवुन देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, काळाधन,अतिरेकी हल्ले कोण कोणत्या प्रकारचे जन आंदोलने केली.आणि कॉंग्रेस सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण केला होता.त्यामुळेच सत्ता परिवर्तन झाले असे समजल्या जाते.
शेतकरी आंदोलनामुळे मात्र सर्वच मनुवादी विचारांची मानसिकता असणाऱ्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांना शेतकरी हिंदूच वाटत नाही.
म्हणूनच शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सिमीवर सुरु असतांना मिरुग सुरु झाला.त्यामुळे शेतकऱ्यांनी काय पेरावे?.स्मार्ट फोन नेटवर्क कि धान्य असा प्रश्न पडला.राजकारणातील राजकीय शेतकरी दरवर्षी कोणते ही पिक न घेता करोडपती होतात.आणि शेतात राब राबणारा शेतकरी कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करतो.ज्या कट्टरपंथीय हिंदुत्वादी पक्षांनी २०१४ च्या अगोदर जागतिक पातळीवर भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला फेसबुक, ट्विटर वर पाठिंबा मिळविला होता.त्याचमुळे भारतातील शेतकऱ्यांनी कि ई व्ही एम मशीन ने आजच्या राजकर्त्याना सत्ताधारी बनविले.शेतकऱ्यांना न्याय देणारा प्रधानसेवकच मोठा चोर चौकीदार निघाला.तो आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे मानवी दुष्टीकोनातून पाहू शकत नाही ही खूप मोठी खेदजनक घटना आहे.आणि सर्वात दुखाची गोष्ट म्हणजे या देशातील बहुसंख्य शेतकरी शेतकरीच नाही.तर कट्टरपंथीय हिंदू म्हणून सत्ताधाऱ्यांच्या सावलीत बसणारा झाला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी काय पेरावे?.स्मार्ट फोन नेटवर्क कि धान्य हे ठरविले पाहिजे.
शेतकरी कोणत्याही जातीचा,धर्माचा,राज्याचा असला तरी तो शेतकरी असला पाहिजे.जाती साठी मातीशी बेईमानी करणारा नसवा.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिहानाचे एक ट्विट ज्याने भारतातील सेलिब्रिटीची झोप उडवून दिली. तेव्हा भारतातील सर्व सेलिब्रिटी आपल्या जातीच्या सरकारचे स्वरक्षणासाठी झुरळा सारखे बाहेर आले आणि चोर चौकीदारचे उघड समर्थन केले. हे मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजातील सर्व शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. मराठा,ओबीसी मागासवर्गीय स्वतःची जात विसरून त्यांच्यात वैचारिक गुलाम म्हणून सहभागी होतात.ते स्वतःच्या जातीच्या रक्षणासाठी कधीच त्यांच्यातून बाहेर पडून बोलण्याची लिहण्याची हिंमत दाखवत नाही.शेतकरी हा शेतकरीचं असतो तो जेव्हा पेरतो तेव्हा ते उगवतेच. आज शेतकरी आंदोलनांचे पडसाद भारतात कमी आणि परदेशात जागतिक पातळीवर त्यांचे पडसाद उमटले जात आहेत.कारण शेतकरी जे पिकवतो त्याला हमीभाव असावा.एम आर पी असावी.
त्यालाच कृषिधोरण कृषी कायदा असावा असे शेतकरी मागत असतांना मोदींनी गौतम अदानी कृषी बिल स्पेशल अध्यादेश काढून मंजूर करून टाकले.त्या विरोधात हे शेतकरी आंदोलने सुरू आहेत त्यांची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या वस्तू ची किंमत ठरविणे अवघड आहे.माणसाने एक दाणा पेरला असता, आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती?. शेतकरी एक एक दाणा जमिनीत पेरतो त्यांची मशागत करतो,रात्रंदिवस त्यांची जपवणूक करतो तेव्हा निसर्ग त्याला हजारो, लाखो दाणे देतो.त्यांची किंमत कोण कशी ठरवतो हाच मोठा प्रश्न आज देशातील शेतकऱ्यांसमोर आहे.धान्य पेरावं की खावं हेच आजच्या माणसांना सुचत नाही.
भारतात सर्वधर्मसमभाव राहिला नाही. असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. कामगार, कर्मचारी अधिकारी, विद्यार्थी सर्वच हिंदू धर्मातील लोक होते.त्यांच्यासाठी असणारे कामगार कायदे रद्द करून भांडवलदारांच्या सोयीचे कायदे करून कोणाला यांनी उध्वस्त केले.हिंदुलाचंना?. आता नंबर शेतकऱ्यांचा लागला.पंजाब हरियाणा राज्यातील शेतकरी त्यांची शिक्षा भोगत असतांनाच तोच संघटित पणे रस्त्यावर उतरून आंदोलनजीवी झाला.बाकीच्या राज्यातील शेतकरी कुठे आहे?.तो शेतकरी म्हणून कुठेही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात उभा राहतांना दिसत नाही.अनेक राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी भाजपाच्या आमदार खासदारांचा वाढदिवसाच्या मोठया प्रमाणात आनंदाने उत्स्फूर्तपणे साजरा करतांना दिसतो.शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे पत्रकार, संपादक त्यांच्या वृत्तपत्रांत भाजपा आमदार खासदारांचे गुणगौरव करतांना दिसतात.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची झळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांत पोचली असती तर त्यानी भाजपा आमदार खासदारांचे मुचके बांधून त्याला मतदारसंघात फिरणे मुश्किल केले असते. म्हणूनच शेतकरी आंदोलनाची झळ फक्त दिल्लीत दिसते.ग्रामीण भागात दिसत नाही.आता शेतीत शेतकऱ्यांनी काय पेरावे?.स्मार्ट फोन नेटवर्क कि धान्य हा प्रश्न त्यांना सतावत आहे.संपूर्ण देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, काळाधन, अतिरेकी हल्ले याविरोधात प्रचंड असंतोष आहे,पण बाहेर का येत नाही. त्यांनी गेला सहा वर्षात जे पेरले ते महाभयंकर आहे,त्यांचे परिणाम येणाऱ्या पिढीला हजारो वर्षे भोगावे लागतील. शेतकरी जे पेरतात ते सर्वांना पोटाला लागणारे असते.त्यात सर्वच मानव प्राणी सुखासमाधानाने जगू शकतात. हे आज काही लोक विसरले आहेत.शेतकऱ्यांनी काय पेरावे? स्मार्ट फोन नेटवर्क कि धान्य?
✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(९९२०४०३८६९)भांडुप मुंबई