पंचायत समिती जिवती येथे जागतिक योग दिवस साजरा

27
✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.21जून):-हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी याबाबत 2014 साली युनोमध्ये प्रस्ताव मांडला होता. यातील 193 सदस्यांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे घोषित केले. त्यानुसार आज योग दिवस साजरा केला जात आहे.

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा असे आवाहन मी आज पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांनी केलो.
व योग दिनाच्या निमित्ताने योग शिक्षकांचा सत्कार विलास कळसकर, डॉ.मनोहर पानपट्टे, नामदेव मुंडे,व्यंकटी तोगरे, करण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष केसव गीरमाजी, तर उद्घाटक पंचायत समिती उपसभापती महेश देवकते तर सुत्रसंचलन विजय गोतावळे यांनी केले आभार बुध्दाजी मेक्षाम यांनी केलो उपस्थित पाहुणे गोपिनाथ चव्हाण, सुनील जाधव सर, व्यंकटी राठोड, अशोक मोरे, मोतिराम शेकडे, बब्बू चव्हाण उपस्थित होते