महागाई थांबविण्यात अपयशी ठरलेल्या राज्य व केंद्र सरकारचा वंचित बहुजन आघाडीतर्फे मलकापूर येथे निषेध

  42

  ✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मलकापूर(दि.21जून):-वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे यांचे नेतृत्वाखाली महागाई विरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले
  जनता सध्या न भूतो न भविष्यती अशा महागाईची झळ सोसत आहे व कोरोना या महामारीमुळे जीव घेणी अवस्था चालू असताना आता त्यांचे जीवन पूर्ण असहाय्य झाले आहे, वैद्यकीय खर्चात जनतेची लूट झालीच आहे.

  शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आता स्वस्त किंमतीत जीवनावश्यक वस्तू पुरविणे तर दूरच राहिले परंतु त्यांचे भाव कडाडले आहेत तसेच या कोरोना महामारीत पोषक आहार घेऊन व प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे ऐवजी उपासमारीची वेळ आलेली आहे त्यातच कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, संचारबंदी नियम पाळून धंदा उद्योग सुद्धा करता येत नाही त्याची जाण नसलेल्या व झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर निषेध करण्यात आला व त्याबाबतचे निवेदन तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले तसेच सरकारने त्यांच्या धोरणाचा विचार करून महागाई आटोक्यात आणावी तसेच शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासोबतच बी-बियाणे स्वस्त किमतीत उपलब्ध करून द्यावे.

  अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी सदर निवेदनात देण्यात आलेला आहेया निषेध आंदोलन प्रसंगी वंचीतचे तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, महिला तालुकाध्यक्ष दक्षशीलाताई झनके, मोगरा ताई, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजू शेगोकार,ता.महासचिव नरसिंग चव्हाण, उपाध्यक्ष अमोल झनके,विनोद निकम,गजानन झनके,विश्वास मोरे, भिमराज मोरे,प्रकाश मोरे,सचिन तायडे,गणेश चोपडे,प्रदीप झाल्टे,प्रभाकर इंगळे, आनंदा वाकोडे,चेतन जगताप,राजेश इंगळे आदी उपस्थित होते