पुसद येथे महागाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे एक दिवशीय धरणे आंदोलन

  46

  ?उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

  ✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले)

  पुसद(दि.21जून):-कोरोना महामारीच्या संकटातून जीव वाचवित जनता बाहेर पडण्यासाठी धडपडत असतांनाच प्रचंड महागाई पेटल्याने गोर गरीब ,शेतकरी, शेतमजूर, कामगार ,लहान व्यावसायीक होरपळून जात आहेत. आघाडी सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पातळीवर अयशस्वी झाली असल्याने ,अन्नधान्य ,डाळी, तेल व ईतर खाद्य पदार्थाच्या जिवनावश्यक वस्तूच्या किमती गोरगरिबांच्या क्रयशक्तीच्या आवाक्या बाहेर गेल्यात,पेट्रोल, डिझेल, गॅसच्या न भूतो न भविष्यती अशा वाढलेल्या किमती मोजतांना डोळ्यात अश्रू येत आहे.

  कोरोनाच्या विळख्या पेक्षाही भयावह असणारा प्रचंड महागाईचा प्रकोप रोखण्यासाठी व जनतेला ह्यातून दिलासा मिळावा ह्यासाठी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज दि.२१/६/२०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .

  त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथे वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन देऊन मा. उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्यामार्फत मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवण्यात आले .

  या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, जिल्हा संघटक राजकुमार ताळीकोटी, तालुकाध्यक्ष दीपक पदमे ,तालुका महासचिव उत्तमराव मस्के, शहराध्यक्ष शेख मुख्तार, विपूल भवरे, प्रसाद खंदारे, शेख असिफ ,शेख मोशीन ,प्रकाश खिलारे ,सन्नी पाईकराव ,दिलीप टाळीकोटे, विकी राठोड ,विठ्ठल टाळीकोटे धीरज कांबळे ,प्रशांत मनोहर,गजानन इंगळे, डॉ. मोसिन पठाण,अरिफ खान,विवेक बैस्कर,आरबाज लाला,किरण पाटील,पवन सुरजुसे,आशुतोष कांबळे,अनिकेत बोरके,शुभम सुर्यवंशी,रोहित सावंत,किरण धुळे,परि पवार,सुधाकर मोदले,मुजाहिद अहेमद,करण लोखंडे,कुणाल गवारे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.