प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुरस्कृत कायदे विषयक सल्ला केंद्र

36

✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

मुबंई(दि.२२जून):- संस्थापक अध्यक्ष मा.श्री.डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शन खाली कायदेविषक सल्ला केंद्र दि.२१ रोजी ठाणे खोपट येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ चे कायदे विषयक सल्लागार ॲड.अमोल सकट यांच्या कार्यालयात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ चे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी पदाधिकारी मा.रमेश मोपकर (राज्य संपर्क प्रमुख), मा.किरण पडवळ(ठाणे जिल्हाध्यक्ष), मा.अंजली देवा (मुंबई महिलाध्यक्षा), मा.ॲड.गणेश पाटील (उच्च न्यायालय वकील), मा.संजय भुजबळ(समाजसेवक) हे उपस्थिती होते .तसेच सदरील कार्यक्रमात पत्रकार संघटनेचे कायदे विषयक सल्लागार श्री. ॲड. अमोल सकट यानी मनोगत व्यक्त करताना सागितले कि संबंधित सल्ला केंद्र हे पत्रकार व संपादक याच्या कुटुंबीयांना प्रथम प्राधान्य देण्यात नेहमी प्रयत्नशील असेल.सदर वक्तव्याचे वरील पदाधिकारी यानी त्याचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.