अॅड.सुधीर कोठारी यांनी वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

29

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.22जून);-कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच सहकार क्षेत्रातील आधारवड असलेले अॅड. सुधीर कोठारी यांनीआपला ७१ वा वाढदिवस कडुलिंबाचे झाड लावुन साजरा केला. झाडे लावा, झाडे जगवा हीआज काळाची गरज असून या जगावर आलेल्या कोरोना महामारीने पर्यावरणाबाबत
मनुष्याने जागरुक असलेच पाहिजे हे आपल्याला शिकविले आहे.

हिंगणघाट शहरातील राजकीय, सहकार, सामाजिक या सर्वच क्षेत्रात अॅड. सुधीर कोठारी यांनी आपल्या कार्याचा
ठसा उमटविला असून त्यांची पर्यावरणाशीसुद्धा नाळ जुळलेली आहे.हिंगणघाटशहरातील वृक्ष लागवड, रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर व इतर सामाजिक कार्यात धडाडिने कार्य करणाऱ्या स्थानिक श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने
वाढदिवसनिमित्त वृक्षारोपण या उपक्रमाअंतर्गत स्मशानघाट रस्त्याचे बाजुला पर्यावरणपुरक असे कडुलिंबाचे झाड लावुन सहकारमहर्षी अॅड. सुधीर कोठारी यांचा ७१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अॅड सुधीर कोठारी यांनी अशा सामाजिक तथा पर्यावरणपुरक कार्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

उपरोक्त संस्था शहरातील रस्त्याच्या बाजुला शहरातील सर्व गणमान्य व्यक्तिचे जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस असो, मुलाचा-मुलीचा, आई-बांबाचा वाढदिवस असो त्यानिमित्यांने पर्यावरणपुरक लावुन झाड लावुन आनंदसोहळा साजरा करीत असतात. याप्रसंगी नगरसेवक आफताब खान, नगरसेवक धनंजय बकाने ,निसर्गसाथी फाउंडेशनचे गुणवंत ठाकरे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांची प्रामुख्याने
उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, उमेश डेकाटे, सचिन एलकुंचवार, योगेश बाकरे, प्रकाश भानुसे , इत्यादीसह अनेक सदस्य उपस्थित होते.