✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.22जून):-येथील प्रभाग क्रमांक १३ मधील शिवाजीनगर भागातील सफाई कामगार, गरोदर महिला,दिव्यांग बांधव, महिला कामगार, अंगणवाडी सेविका, व आशा वर्कर, यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा #शहराध्यक्ष_श्री_देवेंद्रदादा_देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक शहर #अध्यक्ष_आकाश_खरपाडे यांच्या आयोजनातुन कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या कामगारांना त्यांचा सन्मान म्हणून कोरोना सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले.

जेणेकरून त्या व्यक्ती स्वतः सुरक्षित राहून आपले कुटुंब सुरक्षित ठेवतील सदर कोरोना सुरक्षा किट मध्ये सॅनिटायझर, हँड वॉश, मल्टिव्हिटामिन टॅबलेट-सायरप,कॉटन मास्क-सर्जिकल मास्क आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विकास चव्हाण,दिलीप पाटील, महिला शहराध्यक्ष सौ सुधाताई भिसे, संगीताताई मोरखडे, गोपाल पवार, वैभव पवार, भिकाजी सोनोने,राजू पन्हाळकर, दीपक शिंदे, ओम शेटे, निखिल अतकरे, लक्ष्मण पवार अजय मांडवेकर यांची उपस्थिती होती.असे सोशल मीडिया खामगाव तालुका अध्यक्ष यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED