शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

  38

  ?ठाकरे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

  ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

  अमरावती(दि.22जून):– शहिद सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे यांच्या कुटूंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज पिंपळविहिर येथे केले.

  पिंपळविहीर येथील सीआरपीएफ जवान मुकुंद ठाकरे हे नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. शहीद ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले.

  शहीद ठाकरे हे छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात कार्यरत होते. त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहू. या कुटुंबाला शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी सांगितले.

  यावेळी त्यांनी ठाकरे कुटूंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.