योग व व्यायामाला प्रोत्साहन देणारे- मा.आ.भीमसेन धोंडे

  41

  शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम.नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते.व्ययामाने व योग केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते.नियमित व्यायामामध्ये,ताणण्याचे व्यायाम,श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा.व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते.व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो.असे मत मा.आ.भीमसेन धोंडे यांनी योगदिनी बोलतांना व्यक्त केले.ते पुढे आसेही सांगतात की,व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो.तुम्ही जर चार्जिग केलं नाही तर तुमचा मोबाइल फोन चालेल का?अगदी तसेच शरीराला,मनाला,डोक्याला रीचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे.

  शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी नेहमीच योग व व्यायामाला खुप महत्त्व दिलेले आहे.आधी केले आणि मग सांगितले याप्रमाणे ते सततच तरुणांना व्यायामासाठी प्रोत्साहन देत असतात.त्यांच्यामुळेच आज आष्टी शहरात अनेक व्यक्ती सकाळ – संध्याकाळ व्यायाम करुन आष्टी शहरातील त्यांच्या संस्थेचे कृषी महाविद्यालयाचे प्रांगण,पंडित नेहरु विद्यालयाचे प्रांगण तसेच भगवान महाविद्यालयाचे प्रांगण आदी ठिकाणी मनसोक्त व मनमोकळे फिरतांना शहरातील वयोवृद्ध,महिला भगिनीं,तरुण बंधू – भगिनीं दिसतात.तसेच त्यांनी खुले केलेल्या सर्वच ठिकाणी सकाळ – संध्याकाळ आष्टी शहरातील व्यक्ती योग व व्यायाम करतांना मोठ्या प्रमाणात दिसतात.एवढेच नव्हे तर कसलाही बडजावा न करता मा.आ.भीमसेन धोंडे स्वतः सामान्य व्यक्तीं सोबतच व्यायाम करतांना नियमित आढळतात.
  आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात सर्वच वयोगटातील लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे.

  त्यामुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत.अभ्यासाच्या ताणातून मुले मैदानी खेळ व व्यायामापासून दुरावली आहेत.तर तरुण वयातील व्यक्तींना करिअर आणि कामाच्या व्यापातून रोजच्या व्यायामाला वेळ देता येत नाही.अशा बदलत्या जीवनशैलीत व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लठ्ठपणा,हृदयविकार,उच्च रक्तदाब,डायबेटीस,पक्षाघात,सांधेदुखी,गुडघेदुखी,मानसिक तणाव यासारख्या अनेक गंभीर आजारांचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे.पैसा व सुख वस्तूंच्या हव्यासापोटी व्यायामाकडे दुर्लक्ष करून आपण आपले बहुमूल्य असे ‘आरोग्य’ धोक्यात घालत आहोत.त्यामुळे वेळीच सावध होऊन प्रत्येकाने आपापल्या कामातून दररोज थोडा वेळ काढून व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.असेही मत पुढे बोलतांना मा.आ.भीमसेन धोंडे यांनी व्यक्त केले.

  वयाची पासष्टी पार केलेले मा.आ.भीमसेन धोंडे आजही शंभरावर दंड – बैठका सहज लावतात.महाविद्यालयीन जीवनापासूनच कुस्तीची आवड असलेल्या धोंडेंनी अनेक पदकांनाही गवसणी घातलेली आहे.धोंडेंनी या घटकांसाठी तालीमही उभारलेली आहे.आजही दोन वेळा व्यायाम करतात.कुठल्या आधुनिक व यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने नाही तर मनगटातील बळाच्या जोरावर ते जोर काढतात.

  योग दिन विशेष

  ✒️लेखक:-राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो.९४२३१७०८८५