भूवैकुंठ अड्याळ केकडी च्या सेवकांची प्रार्थना मंदिराला भेट:

    39

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रह्मपुरी(दि.22जून):- ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच त्यांचे शिष्य असलेले स्वर्गीय गीताचार्य तुकारामजी दादा यांच्या वचन स्फूर्तीथून सखोल जनकल्याणार्थ तयार केलेल्या सेवकांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांशी श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरास भेट देऊन विविध समस्या विषयी चर्चा केली खरंच श्री गुरुदेवांच्या विचारांवर तेथील कार्यप्रणाली चालू आहे काय

    ?की केवळ नावापुरतेच प्रार्थना मंदिर बनले आहेत यांची सुद्धा विचारपूस केली श्री गुरुदेवांच्या विंचारांची समाजाला गरज असून चांगले चांगले कार्य समाज हिताच्या असावेत असे यावेळी उपस्थित सेवकांनी मन भावना व्यक्त केल्या.

    स्थानिक रणमोचन येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने त्यांचे आभार ही मानण्यात आले यावेळी रनमोचन येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणजी दोनाडकर (सेवानिवृत्त गुरुजी) यांच्यासह भूवैकुंठ वरून आलेले ज्येष्ठ सेवक यांची उपस्थिती होती