ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे येलवाडी देहूगांव जिल्हा पुणे येथे भेट

    32

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

    पुणे(दि.22जून):-महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (चाकण खेड) यांच्या बेजबाबदार व हलगर्जी पणामुळे दिनांक 06/06/2021 रोजी सकाळी 9 वाजता स्व.प्रेम खंडु गावड़े वय वर्षे 16 रा.येलवाडी, जि.पुणे यांचे विद्युत मंडळाच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने प्रेम खंडु गावड़े यांचा मृत्यु झाला. सदर विद्युत महामंडळाच्या तारा अनेक ठिकाणी लोकमकळत व तुटलेल्या असल्याचे निष्पण झाले आहे. यांच्या विद्युत महामंडळाच्या बेजबाबदार व हलगर्जी पणामुळे सध्या अशा अनेक घटना घडत आहेत.

    सदर मयत कु.प्रेम खंडु गावड़े यांच्या मृत्यु प्रकरणात विद्युत महामंडळाचे अभियंतेच जबाबदार आहेत असे प्रथम दर्शनी दिसुन येते.या मृत्यु प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी.म्हणुन दिनांक 12/06/2021 रोजी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई कोर्ट याठिकाणी ह्युमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम.डी.चौधरी यांनी याचिका दाखल केली असुन त्यांची लवकरच सुनावणी चालु होईल अशी आशा व्यक्त केली.

    या सर्व प्रकरणाची चौकशी निमित्त आज दिनांक 22/06/2021 रोजी ह्युमन राईट्सचे असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.एम.डी.चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सचिन गाड़े, खेड तालुक्याचे अध्यक्ष श्री.नितिन गाड़े, महावितरणचे उपअभियंता श्री.राहुल डेरे, कनिष्ठ अभियंता नरवडे, येलवाडी गावचे सरपंच सौ.हीराबाई बोत्रे, उपसरपंच कल्पना गाड़े,सदस्य रणजीत गाड़े, सागर गाड़े, त्याचप्रमाणे संघटनेचे जनसंपर्क अधिकारी सुमित रामभाऊ गाडे, खजिनदार तुषार गाड़े, अतिरिक्त सचिव सुनिल गाड़े, सल्लागार अनिल गाड़े, सहाय्यक सचिव श्रीकांत भसे, कार्याध्यक्ष प्रमोद गाड़े, कायदे सल्लागार निखिल भसे यावेळी उपस्थित होते.