1. ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.22जून):– रस्त्यावर पडलेल्या महिलेवरून भरधाव मालट्रक चालून गेल्याने तिचा मृत्यू झाला मृत महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली होती तिचा अंगावरून चाक गेल्यावर महिलेचा चेंदामेंदा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला हा अपघात महामार्गावर कुणाल हॉटेल समोर घडला याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात माल ट्रक चालकाविरुद्ध अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुवर्णा अशोक गायकवाड वय 48 राहणार मेन रोड गल्ली आडगाव असे मृत महिलेचे नाव आहे या प्रकरणी महिलेचे पती अशोक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

गायकवाड दांपत्य सोमवारी दिनांक 21 दुपारच्या सुमारास आडगाव येथून पंचवटी च्या दिशेने आपल्या दुचाकीवरून डबलसीट प्रवास करीत असताना हा अपघात झाला महामार्गावरून प्रवास करीत असताना हॉटेल कुणाल समोर दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या सुवर्णा गायकवाड या तोल जाऊन दुचाकीवरून पडल्या होत्या याच वेळी पाठीमागून भरधाव येणारा मालक mh15 जी व्ही 55 92 त्यांच्या अंगावर चालून गेला या अपघातात पाठी मागच्या चाकाखाली येऊन त्यांच्या जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कासले करीत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED