

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७
हणेगाव(दि.22जून):-हणेगाव येथे पाठबंधारे विभागाकडून कॕनाल बांधकाम व कॕनालच्या दुरूस्तीसाठी पाहणी केले.हणेगाव येथील तळ्यातील पाणी उन्हाळ्यात सर्व शेतकऱ्यांना मिळावे या धोरणाने शासनाने कॕनालची योजना राबवली होती,परंतु मागील वीस ते पंचवीस वर्षापासून हि योजना डबघाईस येऊन या सर्व कॕनाल जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत,परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाच्या पाण्याने या कॕनालमुळे सर्व शेती वाहून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होत आहे.