सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

24

🔹सर्वसाधारण सभेत सोळा सद्यस्यांचा सभात्याग

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22जून):-ब्रह्मपुरी शहराची सुधारित विकास योजना आराखडा तयार करण्यावरून नगरपरिषद मधील सत्तारूढ व विरोधी पक्षातील सदस्यांनी मंगळवार 22 जून ला आयोजित नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत सोळा सदस्यांनी सभात्याग केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सर्वसाधारण सभा सुरु होण्यापूर्वीच विकास आराखडा कंत्राट भ्रष्टाचार प्रकरणाची वस्तुस्थिती व सत्य बाहेर आल्याशिवाय सभेचे काम चालू द्यायचे नाही अशी भूमिका सत्ताधारी पक्षाच्या सात सद्यस्यांनी, तसेच विदर्भ माझा पक्षाच्या सहा सद्यस्यानी व भारतीय जनता पार्टी च्या तीन सद्यस्यांनी घेऊन सभेच्या उपस्थिती रजिस्टर वर प्रत्यक्षात स्वाक्षरी न करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होईस्त्रव कामकाज चालू न देण्याची भूमिका घेऊन सदी वर बहिष्कार टाकत एकंदरीत सोळा सदस्यांनी सभात्याग केला