देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध मागणीसाठी आमरण उपोषण

    46

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    देवणी(दि.22 जून):- आज उपोषणाचा दुसरा दिवस
    तुरोरी ते तोगरी क्रॉस होणारा रस्ता अतिशय निष्कर्ष झाला असून या कॉन्टॅक्टर चा लायसन रद्द करावा व या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा तसेच देवनी तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत म्हणून यांचा एक वर्षाचा पगार कपात करून आरोग्य विभागाला देण्यात यावे देवणी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कायमस्वरूपी तात्काळ देण्यात यावे व तसेच देवणी येथील भारतीय स्टेट बँकला तात्काळ कायमस्वरूपी मॅनेजर देण्यात यावे.

    तसेच पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा व शेवटच्या टप्प्यातील हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावे देवणी तालुक्यातील सर्व डिपारमेंट चे कर्मचारी व दांडी भादर आधिकारी यांना तात्काळ मुख्यालय राहण्यात यावे हे बंधनकारक करावे व तसेच तालुक्यातील विविध मागण्या तात्काळ मंजूर करावे असे उपोषण राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्क प्रमुख व बसवा टीव्ही मराठी चॅनल चे महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर व तहसीलदार साहेब देवणी यांना आवाहन केले.