येत्या न.प. निवडणुकीत संधीसाधूंना जनताच धडा शिकविणार-आम.कुणावार

87

🔹हिंगणघाट पालिकेतील १० नगरसेवक अडकले शिवबंधनात

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.23जून):-शहरात येत्या नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहु लागले असून स्थानिक नगरपालिकेतील काही विद्यमान सत्ताधारी नगरसेवकांनी कोलांटउडी घेत राज्यात सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे मार्फत सदर भाजपा नेतृत्वावर नाराजी दर्शवित भाजपाच्या दहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकड़े थेट संधान साधले असून काल दि.२१ रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या भाजपाच्या नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्याने शहरात राजकीय पेच निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.

शहरातील विकासकामांना आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पक्षनेतृत्व अपयशी ठरल्याने तसेच पक्षनेतृत्व दुर्लक्ष करीत असल्याचे शिवबंधनात अडकलेल्या नगरसेवकांनी सांगितले असले तरीही नगरपालिकेत पुन्हा निवडून येऊन आपले राजकीय स्थान निश्चित करणे हाच यामागचा उद्देश असल्याचे दिसुन येत आहे.

काल दि.२१ रोजी सायंकाळी शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या हिंगणघाट नगरपालिकेचे नगरसेवकांच्या यादीत भाजपाचे नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे,शिक्षण सभापती सौ.संगीता वाघमारे,नुकताच राजीनामा दिलेले पाणीपुरवठा सभापतीभास्कर ठवरी,स्विकृत सदस्य मनोज वरघणे,अपक्ष निवडून आलेले नगरसेवक सुरेश मुंजेवार यांचा प्रमुख समावेश आहे.यांचेसह सतीश धोबे,सौ.नीता धोबे,नीलेश पोगले,सौ.सुनीता पचोरी,मनीष देवढे यांचाही यात समावेश आहे.उपरोक्त १० नगरसेवकांनी काल मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधून घेतल्याचे वृताने शहरात शहरात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

गेल्या काही महिन्यापासूनच नगरसेवकांच्या गटात नगराध्यक्षाच्या कारभाराविरोधात पक्षनेतृत्वाकड़े अनेकदा आपले गाराने मांडले ,स्थानिक पक्षनेतृत्व यांनी त्यांना समजाविण्या प्रयत्नसुद्धा केला,परंतु पक्षनेतृत्वास त्यांना समजविण्यात यश आले नाही.या दहा नगरसेवकांनी उपरोक्त कारणे दिली असली तरी सत्तालोलुपता हेच त्यामागे मोठे कारण असल्याचे दिसुन येत आहे.तसा या राजकीय उलथापालथ नाट्यामागे सूत्रधार असलेल्या नगरसेवकांचा मागील राजकीय प्रवास पहाता त्यांचे संधीसाधु राजकारणच यामागे खरे सूत्र असल्याचे दिसुन येत आहे.

२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीचे वेध लागताच त्यांनी भाजपचे मतदरसंघातील प्राबल्य पाहुन आमदार समिर कुणावार यांची जी-हुजूरी करीत संधान बांधले,भाजपाच्या कोटयातून नगरसेवक सतीश धोबे यांनी पती-पत्नी दोघांचेही तिकिट मिळविले,धोबे हे राष्ट्रवादी कांग्रेस,भाजपा तसेच आता शिवसेनेत आले.न.प.उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे याच धर्तीवर भाजपात आले,१ वर्ष्यासाठी त्यांना पक्षनेतृत्वाने देऊ केलेले उपाध्यक्ष पद आजतागायत सोडले नाही,कांग्रेस,भाजपा,शिवसेना असा त्याचा राजकीय प्रवास आहे.माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार हे यावेळी अपक्ष निवडून आले असले तरी यापुर्वी राष्ट्रवादी कांग्रेसच्या काळात तत्कालीन आमदार प्रा.राजू तिमांडे यांचे आशिर्वादाने नगराध्यक्ष पद भुषविले होते,परंतु आता ते भाजपाचे सहयोगी सदस्य म्हणून भाजपासोबत जुळले होते

भास्कर ठवरी यांचा शिवसेना,भाजपा,शिवसेना असा राजकीय प्रवास आहे.काल शिवबंधनात अडकनाऱ्यामधे मनीष देवढे हे एक नाव आहे,ते माजी नगराध्यक्ष गिरधर राठी यांचे समर्थक आहेत त्यांनीसुद्धा आता शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
या सर्वच नगरसेवकांची संधीसाधु म्हणून जनतेत प्रतिमा आहे,गेल्या अनेक वर्ष्यापासून हे नगरपालिकेत संधीसाधुपणा हेच त्यांनी सूत्र अवलंबिले असून नेतृत्वावरती दबाव आणून पालिकेतील विकासकामाचे कंत्राट मिळवून गल्लेभरू राजकारण करणे हेच या मंडळीचे उद्दिष्ट आहे,त्याकरीता जातीपातीचे राजकारण करीत वेळप्रसंगी साम,दाम,दंड,भेद या नीतिचा वापर करुन आपला दबावगट निर्माण करणे असाच यांचा इतिहास आहे.

भाजपाचे नेतृत्वाने या सर्व नगरसेवकांच्या कार्यक्षेत्रात किमान कोटि रुपयाची विकासकामे केली आहेत परंतु अश्या संधीसाधूना जनताच आता येत्या निवडनुकित धडा शिकवणार असल्याचे आमदार समिर कुणावार यांनी प्रतिनिधीस प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे.गेल्या २०१६ मधे भाजपाचे आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वात भाजपाने नगरपालिका निवडणुक लढविली होती,त्यावेळी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी हे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहे तर ३८ नगरसेवकांच्या निवडणुकीत २८ नगरसेवक निवडुन आल्याने भाजपाचे बहुमत होते.पक्ष सोडून गेलेले नगरसेवक संधिसाधु असून त्याने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही,अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनीही दिली आहे.