पळसगाव येथे वाघीणीच्या बच्छळ्यासह थरथराट- एक इसम तर, वन कर्मचारी वाघाच्या हल्यात जखमी

82

🔸बघणाऱ्याची तोबा गर्दी – गावालगत तलावाजवळील घटना

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

नेरी(दि.23जून):-ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगांव येथे गावला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या तलावाजवळील झुडपात वाघिणीच्या बछड्याने एका गोरा ठार केला. तर यामध्ये एक इसम व वनकर्मचारी जखमी झाला.पळसगाव गावालगत तलावा शेजारी काल रात्रो शेतकरी सदाशिव वारलू मोहूर्ले यांच्या गोठ्यात एक बैल ठार तर शौच्छास गेलेल्या दोन इसमावर वाघीनीने त्याच्या अंगावर झडप घातली असता एक थोडक्यात बचावला तर दुसरा इसम चरनदास दादाजी बन्सोड हे जखमी झाला.

असून त्यांना पुढील उपचार साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर ला रेफर करण्यात आले आहे.त्या ठिकाणी मोहूले यांचा बैल वाघाने फस्त केला आहे त्या मुळे वाघ त्या ठिकाणी मांडून होता,तीन वाघा पैकी २ बछडे जंगलाच्या दिशेने पळाले मात्र १ वाघ मात्र गावशेजार ठाण मांडून बसला होता अनेक गावकऱ्यांनी वाघ पाहिल आहे. यामुळे या परिसरामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.वाघाला पिटाळून लावण्यासाठी ‘डोल तासाच्या आवाजात वाजविणाऱ्या वाजनत्री वर सुद्धा वाघाने झडप घातली आहे मात्र वेळीच वाजा टाकून पळाला मुळे वाजनत्री सुखरूप आहेत.अनेक दिवसानंतर या गावालगत वाघ सतत दिसत असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऐन हंगामाच्या दिवसात वाघोबा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणेही आता धोकादायक होऊन बसले आहे.या वेळी वाघ कृती दल जाधव मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव,जाधव मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी विशेष वाघ प्रकल्प,अधिकारी,पोलीस कर्मचारी, गेडाम साहेब वनपाल,दांडेकर वनरक्षक,गेडाम वनरक्षक, वनविभागाच्या वनरक्षक, वनकर्मचारी या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र खबरदारीसाठी काय पावले उचलणार, हे मात्र कळलेले नाही.