नगरपालिका पंचायतच्या तयारीला लागा खा.प्रतापराव जाधव

  38

  ✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

  खामगाव(दि.23जून):-लककरच नगरपालिका,जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत त्याच अनुषंगाने शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख वा खासदार प्रतापराव जाधव यांनी स्थानिक विश्राम भवन येथे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिकांची बैठक घेतली त्यात त्यांनी पदाधिकार्यांना स्थानिक निवडणुकीत यश मिळविण्यासाठी कामाला लागा असे आदेशित केले.हि बैठक जिल्हाप्रमुख शांताराम दाणे याचेसह ऊपजिल्हाप्रमुख संजय अवताळे यांचेसह शिवसेना खामगाव तालुकाप्रमुख सुरेशभाऊ वावगे हे हजर होते.या बैठकीच्या माध्यमातुन शहर प्रमुख विभाग प्रमुख पदासाठीही चर्चा करण्यात आली.

  यासाठी ईच्छुकांनी आपली नावे ऊपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख सुरेश वावगे यांचे कडे नावे नोदवावीत असे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी सागितले.यासह मुख्यमंञी शिवसेनेचा असल्याने कर्जमाफी,यासह झालेली विकास कामे घेऊन जनते पर्यन्त पोहचवा असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले 

  बैठकिला ऊपजि.प्र संजय अवताळे,तालुकाप्रमुख सुरेश वावगे,हरिदास हुरसाड,निलेश देवताळु,राहुल कळमकार,ईंदुताई राणे,भारती चिंडाले,सुरेखा चिलवत,बंडु बोदडे,श्रीराम खेलदार,रामेश्वर गायगोळ,देविदास ऊमाळे,
  धिरज कंठाळे,विष्णु कदम,अजाबराव तांगडे,सुभाष वाकुडकर,आत्माराम बगाडे,प्रकाश पवार,पाडुरग जानोकार, महादेव लाहुडकार,बंडु चिकटे,तळपते,गुणवंत पवार,सुभाष ठाकुर,भागवत भिसे ,गजानन ऊटाळे,बाळु पाटिल,सुरेश गाढवे,श्रीक्रुष्ण कळमकार ,विठ्ठल भारसाकळे
  ,संदिप हटकर, गजानन गवई आदी शिवसैनिक हजर होते
  या वेळी रामराव पेसोडे ,संजय खारोडे पिंप्राळा,सुजित तायडे,सुभाष तायडे याचे घरी जाऊन खासदार महोदयांनी या प्रसंगी भेट दिल्या