लोहा तालुक्यात शिवसेनेत गटबाजी;पक्षाला लागली घरघर

113

🔹मातोश्रीने लक्ष घालण्याची गरज

✒️लोहा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लोहा(दि.24जून):-कंधार विधानसभा मतदार संघ म्हणजेच एके काळचा गणला जाणारा शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु आज घडीला लोहा कंधार विधानसभा मतदार संघ म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी पक्षाची बिकट अवस्था झालेली आहे. शिवसेनेला गटबाजीने घेरले असून मातोश्रीवरून विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून या बाबतची चर्चा कट्टर शिवसैनिकात रंगली आहे.नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेची पाळेमुळे रोवणारे नेतृत्व लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील नेतृत्व माजी आमदार रोहिदास चव्हाण ज्यांनी १९८६ पासून नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुके पायी, सायकलने,जमेल त्या वाहनाने फिरुन ग्रामीण भागासह वाडी तांड्यावर शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या.

पक्षाची पाळेमुळे रोवली त्याच पक्षाला आज पूर्वीचे दिवस नविन आलेल्या काही उपर्या नेतृत्वामुळे शिवसेनेला मरगळ आल्याचे स्पष्ट चित्र लोहा मतदार संघात दिसत आहे.एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असतांना नांदेड जिल्ह्यात विशेषतः लोहा विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मरगळ ही अंतर्गत गटबाजीमुळे आल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे.गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन चिखलीकरांनी शिवसेनेत अंतर्गत नाराजीमुळे जय महाराष्ट्र ठोकून भाजपाची वाट धरली.तर माजी आ मतदार रोहिदास चव्हाण यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली मतदार संघात कार्य होत असतांना काही नवख्या गटबाजी करणाऱ्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या वेगवान कार्यात खोडा बसला आहे.पक्षातील नवखे नेतृत्व मातोश्री ने दुर केले तर पक्षात नवचैतन्य निर्माण होईल असे दिसून येते.मातोश्री ने एकहाती कारभार निष्ठावंतांच्या हाती द्यावा.अशी मागणी जोर धरू लागली आहे.सद्यस्थितीत लोहा मतदार संघात शिवसेनेचा मीच प्रमुख कार्यकर्ता म्हणून मिरवित फिरणारे लोहा तालुक्यात त्यांचे दर्शन दुर्मिळ झालेले असून स्थानिकला कमी काम राज्याच्या राजधानीतच जास्त वावरत असल्याचे दिसून येत आहेत.पक्ष वाढीसाठी कोणताच कार्यक्रम हाती घेतलेला नाही.

ज्यांनी एकेकाळी विधानसभा गाजवणारे शेकापचे केशवरावजी धोंडगे यांना शह देऊन मतदारसंघ ताब्यात घेतला.आपली पकड आपला वचक निर्माण केली.जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या,त्या माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवून मतदार संघात शिवसेनेची भगवी लाट पुन्हा प्रस्थापित होईल यासाठी विशेष लक्ष देऊन पक्ष संघटन मतदार संघात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.लोहा तालुक्यात शिवसेनेतील गटबाजी ही नेमकी कुणामुळे? ज्यांनी साधी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊ शकले नाहीत,ज्यांनी राजकारणात प्रवेश दिला त्यांचे होवू शकले नाहीत ते सद्यस्थितीत शिवसेनेची पाळेमुळे रोवणाऱ्यांचे, सर्वसामान्य शिवसैनिकांचे काय होतील? असा सवाल शिवसैनिकात उपस्थित होत आहे.पक्षाला स्थानिक ला गटबाजी करून काय न्याय देतील? मी म्हणजे पक्ष अशा तोऱ्यात वागणार्याला मातोश्रीने कायमचा ब्रेक द्यावा.

असे शिवसैनिकांत बोलल्या जात आहे. एकट्या मध्ये शिवसेनेच्या शाखा उघडणे, शिवसेना पक्षाच्या जिवावर पक्ष संघटन करण्याऐवजी दुसऱ्याच अवैध धंद्यांत रममाण होणाऱ्या तरूण नेत्यांवर मातोश्री ने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा मतदार संघात ऐकावयास मिळत आहे.सद्यस्थितीत लोहा मतदार संघातील गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी म्हणण्याची वेळ आलेली आहे.श्रेष्ठीनी वेळीच लक्ष देऊन बदल घडवण्याची तयारी दर्शवली तर पुन्हा लोहा मतदार संघाला चांगले दिवसं येतील यात शंका नाही.येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहा मतदार संघात शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून पक्ष संघटना साठी कार्य करणाऱ्या अनुभवी नेतृत्वाला मातोश्री ने संधी दिल्यास शिवसेनेची भगवी लाट नक्कीच निर्माण होणार आहे.