✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२४जून):-संपूर्ण जग कोरोना महामारीने एक प्रकारे संपुष्टात आल्यासारखे वाटत होते.कोरोनाने जगात असे थैमान घातले होते की आता जगात कोणीच जिवंत राहणार नाही अशीच अवस्था झाली होती.कोणी कुणाच्या घरी जायचं नाही,नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असले तरी जायचं नाही,जणू या बिमारीमुळे माणसामाणसातील नातेसंबंध संपुष्टात आल्यासारखे झाले होते.या कोरोणा महामारीमुळे मानवजातीला तर फटका बसलाच पण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला सर्वात जास्त फटका बसला आहे.किमान दिड वर्षापासून लाल परी रस्त्यावर धावने बंद केली होती.

अधूनमधून महिना पंधरा दिवस धावली पण आजपर्यंत अखंडित सेवा देणारी ही लाल परी या कोरोना महामारीमुळे एक प्रकारे डबघाईस आल्यासारखे झाली होती.याचाच फायदा घेत खाजगी वाहतूकदारांनी प्रवाशांची अतोनात लुट केली आहे.देगलूर ते हणेगाव यायला ४० रूपये टिकीट असताना या खाजगी वाहनचालकांनी १००रूपये टिकीट घेत जणू काही माणूसकीच विसरली होती.या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठावण्यात आले,त्यानंतर दि.२१जून २०२१ रोजी कर्नाटक सरकारने पण लॉकडाऊन उठवल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन व कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या चालू झाल्यामुळे जणते मध्ये एक प्रकारे आनंद गगणात मावेनासे झाले आहे.
औराद ते हणेगाव किमान बारा किलो मिटरचा अंतर असताना प्रतेकी पन्नास रूपये टिकीट होते,ते आज लाल परी चालू झाली असता वीस रूपये दराने टिकीट चालू झाली आहे.सद्याघडीला या परीसरातील जनता खुप समाधान असल्याचे व्यक्त करीत आहे याचे कारण असे की देगलूर जाऊन येण्यासाठी एकट्याला दोनशे रूपये टिकीट लागत असताना आज फक्त ८० रूपयात जाऊन येणे होत आहे.
महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED